Vicky Kaushal Chhaava Movie: 'छावा'मध्ये विक्की कौशलनं डमी घोडा वापरला? व्हायरल VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, 'मेल कंगना रणौत'
Vicky Kaushal Chhaava Movie: 'छावा' चित्रपट जेवढा विक्की कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना यांच्या अभिनयामुळे गाजला, तेवढाच तो चित्रपटाची भव्यता, चित्रपटात दाखवण्यात आलेले सेट आणि तांत्रिक बाजूंसाठीही चर्चेत आहे.

Vicky Kaushal Chhaava Movie: 2025 चा सर्वात मोठा ओपनर ठरलेला 'छावा' (Chhaava) सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. 'छावा'नं भल्याभल्या दिग्गजांच्या चित्रपटांना पछाडलं आहे. दिवसागणिक 'छावा' कमाईचे विक्रम रचत आहे. 'छावा' चित्रपटातून छत्रपती संभाजी महारांची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर मांडण्यात आली आहे. 'छावा' चित्रपट जेवढा विक्की कौशल (Vicky Kaushal), रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna), अक्षय खन्ना (Akshaye Khanna) यांच्या अभिनयामुळे गाजला, तेवढाच तो चित्रपटाची भव्यता, चित्रपटात दाखवण्यात आलेले सेट आणि तांत्रिक बाजूंसाठीही चर्चेत आहे.
विक्की कौशलनं छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचं सर्वच क्षेत्रांमधून कौतुक होत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि विक्की कौशल यांनी अनेक मुलाखती दिल्या. या मुलाखतींमधून त्यांनी 'छावा'बाबत अनेक महत्त्वाच्या आणि अचंबित करणाऱ्या गोष्टी सांगितल्या होत्या. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना विक्की कौशल म्हणालेला की, "मला लक्ष्मण सरांनी सांगितलेलं की, जोपर्यंत तू तलवारबाजी, घोडेस्वारी शिकत नाहीस, छत्रपती संभाजी महाराजांसारखा दिसत नाहीस, तोपर्यंत मी चित्रपटाचं शूटिंग अजिबात सुरू करणार नाही. मला माझ्या प्रेक्षकांना फसवायचं नाही, मी कोणतेही वीएफएक्स वैगरे तंत्रज्ञान वापरणार नाही." तसेच, दिग्दर्शकांनीही दावा केला होता की, चित्रपटासाठी विक्की कौशलनं चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. यामधील सर्वच्या सर्व सीन्स विक्की कौशलनं स्वतः केले आहेत. पण, आता विक्की कौशल आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी केलेल्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 'छावा'च्या BTS चा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी विक्की कौशलला 'मेल कंगना रणौत' म्हणत आहेत.
View this post on Instagram
'छावा'च्या शूटिंगचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विक्की कौशल डमी घोड्यावर बसून शूटिंग करताना दिसत आहे. यामुळे काही लोकांनी विक्की कौशलसह दिग्दर्शकांवरही टीकेची झोड उठवली आहे. विक्की कौशलनं प्रत्यक्षात घोडेस्वारी शिकलेली नाही, त्यानं प्रेक्षकांना फसवलं आहे, असं म्हटलं आहे. पण, नेमकं खरं काय?
विक्की कौशलनं एका मुलाखतीत बोलताना सांगितलं की, त्यानं तब्बल सहा महिन्यांसाठी घोडेस्वारीचं प्रशिक्षण घेतलं. त्यानं ज्या घोड्यावर सराव केला, त्याचं नाव 'आझाद' होतं. एका मुलाखतीत विक्कीनं सांगितलं होतं की, "मोठ्या लढाईच्या सीनच्या शूटिंगपूर्वी त्यानं 'आझाद'सोबत (घोड्यासोबत) गप्पा मारल्या होत्या. विक्की त्याला म्हणालेला की, "भाई, माझी इज्जत तुझ्या हाती आहे, धाव फक्त, मी तुझ्यासोबत आहे!"
फक्त काही सीन्ससाठीच डमी घोडा?
सोशल मीडियावर सध्या विक्की कौशलचा डमी घोड्यावर बसलेला व्हिडीओ व्हायरल होत आहे. पण, असं बोललं जात आहे की, 'छावा'मध्ये दाखवण्यात आलेले सर्वच्या सर्व सीन विक्की कौशलनंच केलेले आहेत. फक्त काही सीन्ससाठी डमी घोडा वापरण्यात आला आहे. कारण काही तांत्रिक अडचणींमुळे त्या सीन्ससाठी खरा घोडा वापरणं शक्य नव्हतं, अशा काहीच सीन्ससाठी डमी घोडा वापरण्यात आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























