एक्स्प्लोर

RBI : आरबीआयची मोठी घोषणा, 100 आणि 200 रुपयांच्या नव्या नोटा आणणार, जुन्या नोटांचं काय होणार? 

RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच 100 आणि 200 रुपयांच्या नोटा बाजारात आणणार आहे. बाजारातील कॅश सर्क्यूलेशन वाढलं आहे. 

नवी दिल्ली: भारताची मध्यवर्ती बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्य गव्हर्नर म्हणून सजय म्हलोत्रा यांनी कार्यभार स्वीकारला आहे. त्यांच्यापूर्वी शक्तिकांत दास हे हे मुख्य गव्हर्नर होते. आरबीआयनं 100 आणि 200 रुपयांच्या नव्या नोटा छापण्याचा निर्णय घेतला आहे. या नोटा लवकरच जारी केल्या जाणार आहेत. मात्र, याच्या डिझाईनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आरबीआयनं दिलेल्या माहितीनुसार नव्या नोटांवर गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांची सही असेल. ही एक नियमित प्रक्रिया आहे, ज्यामध्ये नव्या गव्हर्नरची नियुक्ती झाल्यानंतर त्यांची सही असलेल्या नोटा जारी केल्या जातात. 

जुन्या नोटांचं काय होणार? 

आरबीआयनं दिलेल्या माहितीनुसार नव्या नोटांप्रमाणं जुन्या नोटा देखील वैध असतील. आरबीआयनं दिलेल्या माहितीनुसार या नोटा लवकरच बँका आणि एटीएममध्ये उपलब्ध असतील. 

आरबीआयनं 2000 हजार रुपयांच्या नोा बंद केल्यानंतर बाजारातील रोकड वाढली आहे. आरबीआयच्या आकडेवारीनुसार मार्च 2017 मध्ये बाजारात 13.35 लाख कोटींची रोकड होती. तर, मार्च 2024 पर्यंत याची वाढ 35.15 लाख कोटी झाली आहे. मार्च 2020 पर्यंत यूपीआय व्यवहारांची संख्या 2.06 लाक कोटी होती. जी फेब्रुवारी 2024 पर्यंत 18.07 लाख कोटी झाली. 2024 चा विचार केला तर वर्षभरात डिजीटल व्यवहारांची संख्या 172 अब्ज इतकी होती. 

रिपोर्टनुसार दिल्ली, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि कर्नाटकमध्ये चालू आर्थिक वर्षात सर्वाधिक रक्कम एटीएममधून काढली गेली. तर, सण आणि निवडणुकीच्या काळात रोख रकमेची मागणी वाढल्याचं दिसून आलं. ग्रामीण भागात डिजीटल पेमेंटची सेवा मर्यादित आहे. यामुळं लोक रोख रकमेचा वापर व्यवहारासाठी करतात. 

दरम्यान शक्तिकांत दास यांच्या जागी मुख्य गव्हर्नर म्हणून निवड झाल्यानंतर संजय म्हलोत्रा यांनी पहिल्याच तिमाहीत रेपो रेट घटवला होता. शक्तिकांत दास यांची त्यानंतर पीएमओमध्ये नियुक्त करण्यात आली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला नोटबंदी जाहीर केली होती. नोटबंदीवेळी त्यावेळी बाजारात असलेल्या 500 रुपये आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. त्याचवेळी केंद्र सरकारनं 500  आणि 2000 रुपयांच्या नोटा जारी केल्या होत्या. मात्र,त्यानंतर आरबीआयनं पुन्हा 2000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.  आता  संजय म्हलोत्रा हे गव्हर्नर झाल्यानं त्यांच्या सहीच्या नोटा छापल्या जाणार आहेत. हा नियमित प्रक्रियेचा भाग आहे. 

इतर बातम्या : 

लाडक्या बहिणींना 2100 रुपये या अधिवेशनात देणार की नाही, पॉईंटेड उत्तर द्या, रोहित पवार, वरुण सरदेसाईंचा प्रश्न, आदिती तटकरे म्हणाल्या....

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Athawale: महायुतीने आम्हाला 4 वाजता जागावाटपाच्या चर्चेला बोलावलं अन्... हा निव्वळ विश्वासघात; रामदास आठवले प्रचंड संतापले
महायुतीने आम्हाला 4 वाजता जागावाटपाच्या चर्चेला बोलावलं अन्... हा निव्वळ विश्वासघात; रामदास आठवले प्रचंड संतापले
Shivsena UBT And MNS Candidate List BMC Election 2026: राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील सर्व उमेदवारांची यादी; ठाकरे बंधूंची भाजपा-शिंदे गटाला कडवी टक्कर!
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील सर्व उमेदवारांची यादी; भाजपा-शिंदे गटाला कडवी टक्कर!
BJP Candidate List BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी भाजपाच्या 97 उमेदवारांची यादी; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
मुंबई महापालिकेसाठी भाजपाच्या 97 उमेदवारांची यादी; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
Bhandup Bus Accident: भांडुपमध्ये बसने 13 प्रवाशांना चिरडलं; महिलांना जागचं हलताही आलं नाही, नेमकं काय घडलं? हादरवणारे PHOTO
भांडुपमध्ये बसने 13 प्रवाशांना चिरडलं; महिलांना जागचं हलताही आलं नाही, नेमकं काय घडलं? हादरवणारे PHOTO

व्हिडीओ

Pune Mahapalika Election : एबी फॉर्मसाठी थंडीतही कार्यकर्त्यांनी ठोकला मुक्काम
Rahul Chavan On Eknath Shinde : पक्षाने माझा केसाने गळा कापला, शिंदेंसोबत गेलेल्या राहुल चव्हाणांची प्रतिक्रिया
Durgeshwari Kosekar Nagpur : भाजपकडून सिव्हिल इंजिनिअर दुर्गेश्वरी कोसेकरला उमेदवारी
Thackeray Brothers BMC Election : मुंबईत ठाकरे ब्रँडची 'मराठी' परीक्षा
Mahayuti on Palika Election : महायुतीतल्या अंतर्गत लढाईत कुणाची सरशी? Special report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramdas Athawale: महायुतीने आम्हाला 4 वाजता जागावाटपाच्या चर्चेला बोलावलं अन्... हा निव्वळ विश्वासघात; रामदास आठवले प्रचंड संतापले
महायुतीने आम्हाला 4 वाजता जागावाटपाच्या चर्चेला बोलावलं अन्... हा निव्वळ विश्वासघात; रामदास आठवले प्रचंड संतापले
Shivsena UBT And MNS Candidate List BMC Election 2026: राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील सर्व उमेदवारांची यादी; ठाकरे बंधूंची भाजपा-शिंदे गटाला कडवी टक्कर!
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील सर्व उमेदवारांची यादी; भाजपा-शिंदे गटाला कडवी टक्कर!
BJP Candidate List BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी भाजपाच्या 97 उमेदवारांची यादी; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
मुंबई महापालिकेसाठी भाजपाच्या 97 उमेदवारांची यादी; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
Bhandup Bus Accident: भांडुपमध्ये बसने 13 प्रवाशांना चिरडलं; महिलांना जागचं हलताही आलं नाही, नेमकं काय घडलं? हादरवणारे PHOTO
भांडुपमध्ये बसने 13 प्रवाशांना चिरडलं; महिलांना जागचं हलताही आलं नाही, नेमकं काय घडलं? हादरवणारे PHOTO
Bhandup : भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, चार जणांचा मृत्यू
भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, चार जणांचा मृत्यू
BMC : साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
BMC Election 2026: शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राम कदमांनी भाजपसाठी तिकीट खेचून आणलं, शिंदे गटाच्या उमेदवाराचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, विक्रोळी वॉर्ड क्रमांक 123 मध्ये काय घडलं?
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राम कदमांनी भाजपसाठी तिकीट खेचून आणलं, शिंदे गटाचा इच्छूक उमेदवार अजितदादांच्या राष्ट्रवादीत, विक्रोळीच्या वॉर्ड क्रमांक 123 मध्ये काय घडलं?
Chhatrapati Sambhajinagar Election 2026: भाजपने एकीकडे चर्चेचं नाटक केलं अन् दुसरीकडे स्वत:च्या उमेदवारांना तयार ठेवलं, संजय शिरसाटांचा गंभीर आरोप
भाजपने आम्हाला गाफील ठेवलं, ऐनवेळी आमची धावपळ करण्याचा प्लॅन आखला होता: संजय शिरसाट
Embed widget