एक्स्प्लोर

Agri stock after Budget 2025: बजेटनंतर कृषी कंपन्यांचे स्टॉक्स बुंगss ! Seed कंपन्या तेजीत, कोणत्या कंपन्या फायद्यात ? 

बजेटनंतर सीड कंपन्यांचे शेअर्स 2 ते 9 टक्क्यांनी वाढलेले होते याशिवाय किसान क्रेडिट कार्डची  कर्ज मर्यादा पाच लाख रुपयांपर्यंत वाढवली जाईल या निर्णयांमुळे उद्योग जगतातूनही बजेटला पाठिंबा दर्शवला जातोय

Agri stocks after Budget :केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन(Nirmala Sitaraman)यांनी 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प मांडला .कृषी क्षेत्रासाठी तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी धोरणात्मक घोषणा केल्यानंतर शनिवारी देशातील कृषी कंपन्यांचे  समभाग जवळपास 13 टक्क्यांपर्यंत वाढले होते . (agri stocks ) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना जाहीर केल्यानंतर देशातील जवळपास 100 जिल्ह्यांमध्ये कमी उत्पन्न आणि घसरलेल्या हमीभावाच्या  गर्तेत  सापडलेल्या कृषी कंपन्यांचा यात समावेश होता .

सीड कंपन्या तेजीत , कृषी उद्योग जगतातून बजेटचे स्वागत

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तूर उडीद आणि मसूर या पिकांवर लक्ष केंद्रित करून पुढील सहा वर्षात डाळींवरील अवलंबित व कमी करण्याच्या मिशनची रूपरेषा आखत 1.7 कोटी शेतकऱ्यांना अल्पमुदतीचे कर्ज उपलब्ध करून देण्याची घोषणा केली .तसेच किसान क्रेडिट कार्ड कर्जाची मर्यादा ही पाच लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर कृषी क्षेत्रातील शेअर बाजार कंपन्यांचे समभाग वधारले होते .

बजेटनंतर सीड कंपन्यांचे शेअर्स 2 ते 9 टक्क्यांनी वाढलेले होते .यामध्ये कावेरी सीड्स ,जैन इरिगेशन सिस्टीम,मंगलम सीड्स,जे के ऍग्री जेनेटिक्स,नाथ बायो जीन्स,धानुका एग्री टेक,श्री ओसवाल सीड्स या कृषी संबंधित कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश होता.

कोणत्या कंपन्यांचे समभाग होते फायदात ?

परदीप फॉस्फेट्स : + 2 .75% (RS 115 .90)
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स : + 0 . 95 % (164 .75)
PI इंडस्ट्रीज : + 0.85 % ( Rs 3512.05 )
मेंगलोर केमिकल्स अँड फर्टीलायझर्स ( 168 .84)
क्रोनिकल इंटरनॅशनल +0.11 % ( 1812)
टाटा केमिकल या कंपनीचे समभाग 0.30% ने घसरून 983 . 85 रुपयांवर आला होता .

कृषी उद्योग जगतातून बजेटचे कौतुक

दरम्यान बजेटमध्ये बिहार साठी पिकाचे उत्पादन वाढवण्याकरिता मखाना बोर्ड तयार करण्याची घोषणा करण्यात आली .तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पाच वर्षांचे मिशन सुरू केले जाईल .याशिवाय किसान क्रेडिट कार्डची  कर्ज मर्यादा पाच लाख रुपयांपर्यंत वाढवली जाईल या निर्णयांमुळे उद्योग जगतातूनही बजेटला पाठिंबा दर्शवला जात आहे .

कृषी क्षेत्रासाठी कोणत्या महत्त्वाच्या घोषणा केल्या ?

1) किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्यात आली आहे.  3 लाखांवरुन किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाख करण्यात आली आहे. 

2) यूरीया निर्मितीत आत्मनिर्भरता आणण्यासाठी ईशान्य भारतात तीन कारखाने निर्माण करण्यात येणार आहे. याची मर्यादा ही 12.7 लाख मेट्रिक टन असणार आहे.

3) पंतप्रधान धन धान्य कृषी योजना राबवणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली आहे. राज्यांच्या सहाय्यानं ही योजना राबवण्यात येणार आहे.  यामध्ये 100 जिल्ह्यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. 1.7 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. 

4) डाळींसाठी 6 वर्षांसाठी आत्मनिर्भरता योजना लागू करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितले.

5) फळ भाजी उत्पादकांसाठी विशेष योजना राबवण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली. 

6) बिहारमध्ये मकाना बोर्डची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली. 

7) अंदमान आणि निकोबार आणि लक्षद्वीप बेटांवर लक्ष केंद्रित करून समुद्रातून मासेमारीचे शाश्वत संकलन करण्यात येणार आहे.

8) कापूस उत्पादकतेसाठी 5 वर्षांचे अभियान जाहीर करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी विशेष योजना राबवण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली. कापसाच्या विविध जाती विकसित करणार तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कापूस उत्पादनाला जोड देणार.

9) कृषी क्षेत्र आत्मनिर्भरतेकडे नेण्यासाठी विशेष लक्ष देणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितले.

10) निर्यात करणाऱ्या एमएसएमईला 20 कोटींपर्यंतचं मुदत कर्ज 

हेही वाचा:

Agriculture Budget 2025 : अर्थसंकल्पात पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेची घोषणा, 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Budget 2025 : कृषी क्षेत्रात एआय वापरासाठी धोरण, राज्यातील शेतकऱ्यांसाठी 9 हजार 710 कोटी रुपयांची तरतूद; अजितदादांच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काय?
कृषी क्षेत्रात एआय वापरासाठी धोरण, राज्यातील शेतकऱ्यांसाठी 9 हजार 710 कोटी रुपयांची तरतूद; अजितदादांच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काय?
Maharashtra Budget 2025: नक्षलग्रस्त गडचिरोलीची ओळख पुसली जाणार! अर्थसंकल्पात अजित पवारांकडून घोषणांचा पाऊस, विदर्भाच्या वाट्याला काय?
नक्षलग्रस्त गडचिरोलीची ओळख पुसली जाणार! अर्थसंकल्पात अजित पवारांकडून घोषणांचा पाऊस, विदर्भाच्या वाट्याला काय?
Maharashtra Budget 2025 : कुंभमेळ्यासाठी विशेष प्राधिकरणाची स्थापना, रामकुंड, काळाराम मंदिर, गोदाकाठ विकासासाठी अजितदादांची मोठी घोषणा, उत्तर महाराष्ट्राच्या वाट्याला काय?
कुंभमेळ्यासाठी विशेष प्राधिकरणाची स्थापना, रामकुंड, काळाराम मंदिर, गोदाकाठ विकासासाठी अजितदादांची मोठी घोषणा, उत्तर महाराष्ट्राच्या वाट्याला काय?
Maharashtra Budget 2025 Ajit Pawar: राज्यातील मुस्लीम तरुणांसाठी महायुती सरकारचं मोठ्ठं पाऊल, अजित पवारांनी अर्थसंकल्पात केली ही महत्त्वाची घोषणा घोषणा
अजित पवारांची मुस्लीम समाजासाठी महत्त्वाची घोषणा, 'या' संस्थेसाठी भरभक्कम निधीची तरतूद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde - Uddhav Thackeray पहिल्यांदाच समोरासमोर, एकमेकांकडे पाहिलंही नाहीAjit Pawar On Ladki Bahin : 2025-26 मध्ये लाडकी बहिण योजनेसाठी 36 हजार कोटींची तरतूद : अजित पवारABP Majha Marathi News Headlines 02.00 PM TOP Headlines 02.00 PM 10 March 2025Maharashtra Budget Session 2025 | महायुतीचा बजेट मांडताना अजितदादांसमोर कोणती आव्हानं? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Budget 2025 : कृषी क्षेत्रात एआय वापरासाठी धोरण, राज्यातील शेतकऱ्यांसाठी 9 हजार 710 कोटी रुपयांची तरतूद; अजितदादांच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काय?
कृषी क्षेत्रात एआय वापरासाठी धोरण, राज्यातील शेतकऱ्यांसाठी 9 हजार 710 कोटी रुपयांची तरतूद; अजितदादांच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काय?
Maharashtra Budget 2025: नक्षलग्रस्त गडचिरोलीची ओळख पुसली जाणार! अर्थसंकल्पात अजित पवारांकडून घोषणांचा पाऊस, विदर्भाच्या वाट्याला काय?
नक्षलग्रस्त गडचिरोलीची ओळख पुसली जाणार! अर्थसंकल्पात अजित पवारांकडून घोषणांचा पाऊस, विदर्भाच्या वाट्याला काय?
Maharashtra Budget 2025 : कुंभमेळ्यासाठी विशेष प्राधिकरणाची स्थापना, रामकुंड, काळाराम मंदिर, गोदाकाठ विकासासाठी अजितदादांची मोठी घोषणा, उत्तर महाराष्ट्राच्या वाट्याला काय?
कुंभमेळ्यासाठी विशेष प्राधिकरणाची स्थापना, रामकुंड, काळाराम मंदिर, गोदाकाठ विकासासाठी अजितदादांची मोठी घोषणा, उत्तर महाराष्ट्राच्या वाट्याला काय?
Maharashtra Budget 2025 Ajit Pawar: राज्यातील मुस्लीम तरुणांसाठी महायुती सरकारचं मोठ्ठं पाऊल, अजित पवारांनी अर्थसंकल्पात केली ही महत्त्वाची घोषणा घोषणा
अजित पवारांची मुस्लीम समाजासाठी महत्त्वाची घोषणा, 'या' संस्थेसाठी भरभक्कम निधीची तरतूद
Maharashtra Budget 2025: मुंबईसाठी महायुती सरकारचा मोठ्ठा प्लॅन, रोजगार आणि गुंतवणूक खटाखट वाढणार, अर्थमंत्री अजित पवार यांची महत्त्वाची घोषणा
मुंबईसाठी महायुती सरकारचा मोठ्ठा प्लॅन, रोजगार आणि गुंतवणूक खटाखट वाढणार, अर्थमंत्री अजित पवार यांची महत्त्वाची घोषणा
Maharashtra Budget 2025-26 अजित पवारांनी सादर केला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प; पायाभूत सुविधा, मुंबई, पुणे, शेतकरी, एका क्लिकवर A टू Z माहिती
अजित पवारांनी सादर केला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प; पायाभूत सुविधा, मुंबई, पुणे, शेतकरी, एका क्लिकवर A टू Z माहिती
Tips For Car Driving: घाटात गाडी चालवताना काय काळजी घ्यायची?
Tips For Car Driving: घाटात गाडी चालवताना काय काळजी घ्यायची?
Maharashtra Budget 2025: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर; फडणवीस सरकारच्या 10 मोठ्या घोषणा
Maharashtra Budget 2025: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर; फडणवीस सरकारच्या 10 मोठ्या घोषणा
Embed widget