एक्स्प्लोर

राज कांबळे.. क्रिएटिव्ह वर्ल्डचा बादशाह..!

राज कांबळे... क्रिएटिव्ह वर्ल्डचा बादशाह... म्हणजेच क्रिएटिव्ह जाहिरातींचा बादशाह. २०१७ ‘माझा सन्मान’ चा सन्मानार्थी... कलेच्या एका वेगळ्या दुनियेत वावरणारा हा अवलिया... जे आपल्याला सरळ साध दिसतं त्या सगळाकडे तो एका वेगळ्या दृष्टीनकोनातून बघत असतो... आणि म्हणूनच तो आहे क्रिएटिव्ह जाहिरातींचा बादशाह..!!!

राज कांबळे... क्रिएटिव्ह वर्ल्डचा बादशाह... म्हणजेच क्रिएटिव्ह जाहिरातींचा बादशाह. २०१७ ‘माझा सन्मान’ चा सन्मानार्थी... कलेच्या एका वेगळ्या दुनियेत वावरणारा हा अवलिया... जे आपल्याला सरळ साध दिसतं त्या सगळाकडे तो एका वेगळ्या दृष्टीनकोनातून बघत असतो... आणि म्हणूनच तो आहे क्रिएटिव्ह जाहिरातींचा बादशाह..!!! माझगाव ते न्यूयॉर्क व्हाया सारं जग, असा त्याचा क्रिएटिव्ह प्रवास... राज हा मुळचा मुंबईचा... लहानपणापासून नसानसात बंडखोरी भिनलेली. त्यामुळे त्याने मराठी माध्यमाच्या शाळेत न जाता, माझगावमधल्या ज्यू शाळेत प्रवेश घेतला. जिथे आजही हिब्रू भाषेत प्रार्थना म्हटली जाते... राजची शाळा पूर्ण झाली आणि वडिलांच्या इच्छेनुसार मुंबईतल्याच व्हीजेटीआय या संस्थेत प्रवेश घेतला... ते इंजिनिअर होण्याचं स्वप्न उराशी बाळगत. पण आठ दिवसांत आपलं गणित चुकलंय, हे राजच्या लक्षात आलं आणि एक अधिक एक-दोन करण्यापेक्षा एक अधिक एक क्रिएटिव्हली कसं दाखवू शकतो, याचा तो विचार करू लागला.. कारण मुळात बंडखोर वृत्ती आणि उपजत असलेल चित्रकलेच वरदान... आयुष्यात छोटेमोठे पेच प्रसंग येतच असतात.. त्यातलाच हा एक... राजने आई- वडिलांची समजूत काढली आणि सर. ज.जी कला महविद्यालयात (सर. जे.जे स्कूल ऑफ आर्ट) प्रवेश मिळवला. इथून सुरू झाला राजचा आणि जाहिरातींचा क्रिएटिव्ह प्रवास.. राजने जे. जेच्या शेवटच्या वर्षात गोल्ड मेडल पटकवलं. आणि लिंटाससारख्या नामांकित जाहिरात कंपनीत नोकरी देखील केली. लिंटासमध्ये काम करत असतांना राजच्या जहिरातींनी अनेक पारितोषिकं पटकावली... जेव्हा या क्षेत्रात पाऊल टाकलं, तेव्हा त्याचं इंग्रजी फारसं चांगलं नव्हतं असं राज कांबळे स्वतः सांगतो. पण वेगळा क्रिएटिव्ह विचर केला नाही, तर तो राज कसला... स्वतःच्या विकनेसचा त्याने फायदा करून घेतला. अशा जाहिराती बनवल्या, ज्यात शब्दच नाहीत. यलो पेजेससाठी राजने जी जाहिरात तयार केली, त्यात एक कोरी करकरीत गीता, तसंच बायबल आणि कुराण ठेवलं. आणि त्याच्या बाजूला एक खूप वापरलेलं यलो पेजेसचं पुस्तक ठेवलं. म्हणजे इतर कशाहीपेक्षा यलो पेजेस जास्त वापरली जाते, ही कल्पना त्याने शब्दाशिवाय मांडली. 'डीएनएडी' हे युकेचं जगप्रसिध्द पारितोषिक या जाहिरातीला मिळालं. भारतात पहिल्यांदाच कोणालातरी हे पारितोषिक मिळालं होतं. म्हणून खूष होऊन राजला त्याचा वरिष्ठांनी न्यूयॉर्कमधल्या लिंटासच्या ऑफिसमध्ये काम करायला आवडेल का असं विचारलं. आलेल्या संधीचं सोन करायचा, असा चंग त्याने केला. आणि अवघा २४ वर्षाचा राज न्यूयॉर्कला गेला... शब्दांचा वापर न करता दृश्यमाध्यमातून आशय, जाहिरातींच्या मध्यमातून तो लोकांपर्यंत पोहचवू लागला... आणि जर्मनी, जपानसारख्या देशांनी देखील या जाहिरातींना डोक्यावर घेतलं. कारण तिथे शब्दांचा, भाषेचा अडथळा नव्हता. परदेशात काम करतांनाही राजच्या कामाला आंतरराष्ट्रीय पारितोषिक मिळाले. त्यात कान्स फेस्टिव्हलमधलं गोल्डन लायन विसरून चालणार नाही.. राज पुढे न्यू यॉर्कच्या लिंटास जाहिरात कंपनीचा प्रमुख बनला.. आपल्या कारकीर्दीत त्यांने अनेक जाहिराती केल्या. त्यात महत्वाची पॉलिटिकल कॅमपेन आणि तीही अंतरराष्ट्रीय दर्जाची. 2008 साली अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदासाठी निवडणुका होणार होत्या. बराक ओबामा यांना राष्ट्रपतीपदासाठी अमेरीकेच्या डेमोक्रॅटिक पार्टीने उमेदवार म्हणून घोषित केलं होतं. आणि याच निवडणुकांच्या सोशल मीडियावरच्या कॅम्पेनची जबाबदारी राज कांबळेकडे होती... जाहिरातींचं सारं जग जवळपास राजच्या मुठीत होतं... पण तरीही त्याला आपल्या देशात परत यायचं होतं. कालंतराने राज भारतात परत आला. कारण भारतात निर्माण झालेल्या संधी त्याला खुणवत होत्या. आज राजची स्वतःची जाहिरात कंपनी आहे. त्यातूनच तो त्याचा क्रिटिव्ह प्रवास करतांना दिसतो. राज कांबळे 'कान्स लायन्स फेस्टिव्हल ऑफ क्रिएटिव्हिटी'मध्ये जाहिरातींच्या विभागासाठी ज्यूरी म्हणून भारताच प्रतिनिधित्व करतो. असा हा प्रयोगशील क्रिएटिव्ह माणूस.. आयडिया जगात कुठेही मिळतात म्हणणारा राज कांबळे स्वतःबद्दल सांगतांना म्हणतो की “ माझ्याकडे एकच गोष्ट होती ती म्हणजे हार्ड वर्क.. कष्ट करण्याची इच्छा. ती कोणीही माझ्याकडून हिरावून घेऊ शकत नव्हतं.. आणि म्हणूनच मी इथवर पोहचू शकलो..” म्हणूनच ऐन तारुण्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर जाहिरात क्षेत्रातील क्रिएटिव्हिटिवर मराठी मोहर उमटविणाऱ्या राज कांबळेला मी म्हणते क्रिएटिव्ह जाहिरातींचा बादशाह !!!
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Surve : एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार, वॉर्ड 4 आणि 5 मधून कोण रिंगणात?
एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार
India Women vs Sri Lanka Women, 5th T20I: टीम इंडियानं श्रीलंकेचा धुव्वा उडवला; वर्ल्डकपपूर्वी 5-0 ने व्हाईटवाॅश देत निर्विवाद वर्चस्व
टीम इंडियानं श्रीलंकेचा धुव्वा उडवला; वर्ल्डकपपूर्वी 5-0 ने व्हाईटवाॅश देत निर्विवाद वर्चस्व
बांगलादेशच्या माजी पीएम खालिदा झिया यांचे निधन; पाकिस्तानात नजरकैद, गोळीबारात वाचल्या, पीएम होताच भारताचा विरोध
बांगलादेशच्या माजी पीएम खालिदा झिया यांचे निधन; पाकिस्तानात नजरकैद, गोळीबारात वाचल्या, पीएम होताच भारताचा विरोध
BMC Election: ठाकरे बंधूंच्या युतीत एकाच प्रभागात दोन महिला आमने-सामने अन् शिवसैनिकांसह मनसैनिकही संभ्रमात!
ठाकरे बंधूंच्या युतीत एकाच प्रभागात दोन महिला आमने-सामने अन् शिवसैनिकांसह मनसैनिकही संभ्रमात!
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Full : तिकीट न मिळाल्यानं कार्यकर्त्यांच्या नाराजीचा महापालिका निकालांवर किती परिणाम?
Chhatrapati SambhajiNagar BJP तिकीट का कापलं? निष्ठावंतांच्या भावनांचा कडेलोट, आयारामांना झुकतं माप?
BJP Elections Special Report तिकीट देताना निष्ठावंतांना डावललं? भाजप कार्यकर्त्यांचा संताप
Yogesh Gonnade आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करुन अर्ज,शिवसेनेकडून उमेदवाराला स्मशानभूमीत AB फॉर्म
Neelam Gorhe : भाजपा आम्हाला काहीही स्पष्ट करत नाही; आमची युती...; नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Surve : एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार, वॉर्ड 4 आणि 5 मधून कोण रिंगणात?
एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार
India Women vs Sri Lanka Women, 5th T20I: टीम इंडियानं श्रीलंकेचा धुव्वा उडवला; वर्ल्डकपपूर्वी 5-0 ने व्हाईटवाॅश देत निर्विवाद वर्चस्व
टीम इंडियानं श्रीलंकेचा धुव्वा उडवला; वर्ल्डकपपूर्वी 5-0 ने व्हाईटवाॅश देत निर्विवाद वर्चस्व
बांगलादेशच्या माजी पीएम खालिदा झिया यांचे निधन; पाकिस्तानात नजरकैद, गोळीबारात वाचल्या, पीएम होताच भारताचा विरोध
बांगलादेशच्या माजी पीएम खालिदा झिया यांचे निधन; पाकिस्तानात नजरकैद, गोळीबारात वाचल्या, पीएम होताच भारताचा विरोध
BMC Election: ठाकरे बंधूंच्या युतीत एकाच प्रभागात दोन महिला आमने-सामने अन् शिवसैनिकांसह मनसैनिकही संभ्रमात!
ठाकरे बंधूंच्या युतीत एकाच प्रभागात दोन महिला आमने-सामने अन् शिवसैनिकांसह मनसैनिकही संभ्रमात!
तर त्याला टायरीत घालतो म्हणणाऱ्या 'पालकमंत्री' अजितदादांकडून पुण्यात अट्टल गुन्हेगारांना रेड कार्पेट सुरुच! आंदेकर, गजा मारणेच्या बायकोनंतर आणखी एक गुन्हेगार शोधत उमेदवारीची 'बक्षिसी'
तर त्याला टायरीत घालतो म्हणणाऱ्या 'पालकमंत्री' अजितदादांकडून पुण्यात अट्टल गुन्हेगारांना रेड कार्पेट सुरुच! आंदेकर, गजा मारणेच्या बायकोनंतर आणखी एक गुन्हेगार शोधत उमेदवारीची 'बक्षिसी'
पुण्यात नऱ्हेजवळ भुमकर चौकात भयंकर ट्रॅफिक; नववर्षानिमित्त येणाऱ्या पर्यटकामुळे पुणेकर अडकले
पुण्यात नऱ्हेजवळ भुमकर चौकात भयंकर ट्रॅफिक; नववर्षानिमित्त येणाऱ्या पर्यटकामुळे पुणेकर अडकले
BMC Election: ठाकरेंच्या शिवसेनेतही बंडाची लागण! थेट पक्षप्रमुखांसमोर अनिल परबांनी ताकद लावलेल्या उमेदवारानं सुद्धा बंडाची मशाल पेटवली, वरुण सरदेसाईंना तगडा झटका?
ठाकरेंच्या शिवसेनेतही बंडाची लागण! थेट पक्षप्रमुखांसमोर अनिल परबांनी ताकद लावलेल्या उमेदवारानं सुद्धा बंडाची मशाल पेटवली, वरुण सरदेसाईंना तगडा झटका?
पहिल्यांदा नाशिकमध्ये भाजपचे AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाड्यांचा चक्क पाठलाग, आता थेट आमदार सीमा हिरे आणि उमेदवाराच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल!
पहिल्यांदा नाशिकमध्ये भाजपचे AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाड्यांचा चक्क पाठलाग, आता थेट आमदार सीमा हिरे आणि उमेदवाराच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल!
Embed widget