IPL 2025, GT vs LSG : निकोलस द बॉस

विश्व इलेवन संघा कडून खेळत असताना जेव्हा ऑस्ट्रेलिया मधील प्रसारमाध्यमे गॅरी सोबर्स आणि त्यांच्या संघाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत होते...तेव्हा एकदा फलंदाजीला जाताना गॅरी सोबर्स सुनील गावसकर यांना म्हणाले होते.. "सनी यांना दाखवतो बॉस कोण आहे"
सध्या IPL मध्ये निकोलस पुरण जेव्हा फलंदाजीला येतो तेव्हा तो सुद्धा गॅरी सोबर्स यांचा तोच एटीट्यूड कॅरी करतो..त्याने आतापर्यंत या स्पर्धेत 349 धावा केल्यात आणि त्या सुद्धा 162 चेंडूत म्हणजे स्ट्राईक रेट आला तो 215 चां..आणि त्याचे षटकार होते 31.. त्याची षटकार मारण्याची क्षमता त्याला इतर फलंदाजांपेक्षा वेगळा बनविते...
भारताकडून खेळत असताना ही क्षमता सलीम दुर्राणी यांच्याकडे होती असे म्हणतात..त्यांना तेव्हा त्यांचे सहकारी म्हणत असत की तुम्ही जर आत्मचरित्र लिहिलेत तर त्यांचें नाव आस्क फोर सिक्स असे ठेवा असे सांगत..
निकोलस पुरण ने सुद्धा असा विचार करायला हरकत नाही..आज सुद्धा तो जेव्हा खेळायला आला तेव्हा 82 चेंडूत 116 धावांची गरज होती ..एखाद दुसरा बळी सामन्याचे चित्र बदलवू शकला असता..पण निकोलस पुरण ने आल्या आल्या रशीद ला त्याच्या डोक्यावरून जो षटकार खेचला तो अफलातून होता...त्यानंतर निकोलस पुरण ने कोणालाही दया दाखविली नाही...त्यानंतर सुंदर ला लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह चा षटकार ...साई किशोर ला दोन ओन साइड वर षटकार. आणि नंतर आलेल्या सिराज च्या उजव्या यष्टी बाहेर कमी वेगातील चेंडूवर पुन्हा एकदा मिड विकेट परिसरात षटकार खेचून त्याने सामन्याचे चित्र पालटले...
आजच्या सामन्यात लखनौ ची सलामी सुद्धा चांगली झाली..त्यांनी 65 धावांची सलामी देऊन उत्तम सुरुवात केली..आज मकरम चा मार सुद्धा गुजरातच्या संघाला पडला...आज त्याने या सर्धेत आपले दुसरे अर्धशतक पूर्ण केले...त्याने मारलेले षटकारांची संख्या जरी कमी असली तरी त्याने लखनौ संघासाठी एक परिपक्व खेळी केली..
आज नाणेफेकीचा कौल लखनौ संघाने जिंकून प्रथम क्षेत्र रक्षण स्वीकारले...आणि प्रथम फलंदाजीस आमंत्रण दिले ते गुजरात संघाला ..त्यांनी सुरुवातीपासून सावध फलंदाजी केली. .सलामीसाठी 120 धावांची भागीदारी केली..पण नंतर त्यांची धावगती मंदावली. .या भागीदारीत ते दोघे किती खास फलंदाज आहेत हे दिसून आले..दोघांच्या ही भात्यातील ड्राईव्ह,कट..पुल सर्वच किती देखणे होते...पण त्यांनी रचलेल्या पायावर इतर फलंदाज कळस चढविण्यात मात्र अपयशी ठरले...याला कारण होते लखनौ संघाची गोलंदाजी आणि पंत ने लावलेले क्षेत्ररक्षण ...शार्दुल आणि बिश्नोई यांनी उत्तम गोलंदाजी करून लखनौ संघाला 180 धावपर्यंत रोखले..
आजच्या विजयाने लखनौ संघ तिसऱ्या स्थानावर गेला...आणि पुन्हा एकदा गोयंका साहेबांच्या चेहऱ्यावर हसू आलें...ते हसू कायम राहण्यासाठी पंत ची बॅट तळपणे सुद्धा लखनौ संघाची गरज आहे. .आणि पंत लवकर बहरेल अशी आशा लखनौ चे चाहते करीत असतील..

























