एक्स्प्लोर

South Cinema, SS Rajamouli: साऊथच्या 'या' 3 फिल्म्स घालणार धुमाकूळ, सर्वात मोठ्या दिग्दर्शकाचा विश्वास; Pushpa 2, Chhaava चे रेकॉर्ड्सचाही करतील चक्काचूर

South Cinema, SS Rajamouli: RRR सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट बनवणारे दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी अलीकडेच एका कार्यक्रमादरम्यान तीन दक्षिण चित्रपटांची नावं उघड केली, ज्यांची ते आतुरतेनं वाट पाहत आहेत.

South Cinema, SS Rajamouli: भारतातील सर्वात मोठ्या दिग्दर्शकांपैकी (One Of The Greatest Directors In India) एक असलेल्या एसएस राजामौली (SS Rajamouli) यांना बाहुबली सीरिजमधील (Bahubali Series) दोन्ही चित्रपटांमुळे पहिल्यांदाच दाक्षिणात्य चित्रपटांना (Southern Films) देशाबाहेरही ओळख मिळाली. यानंतर, 2022 चा आरआरआर (RRR) आला आणि त्यानं फक्त देशातीलच नाहीतर, जगातील फिल्म इंडस्ट्री (Film Industry) हादरवून सोडली. या चित्रपटानं 'नाटू नाटू' (Natu Natu) गाण्यासाठी ऑस्कर (Oscar Award) पटकावला. पण, हे सारं इतक्यावरच थांबत नाही, तर त्यांच्या चित्रपटानं केवळ भारतातच नाहीतर इतर अनेक देशांमध्येही धुवांधार कमाई केली. कोई मोईनं दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटानं जपानमध्ये 136 कोटी रुपयांची कमाई केली आणि जपानमधील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला.

आता या चित्रपटाची बिहाइंड द सीन्स डॉक्युमेंट्री 'RRR: बिहाइंड अँड बियॉन्ड' जपानमध्ये प्रदर्शित होत आहे. या संदर्भात, राजामौली यांनी अलिकडेच जपानला भेट दिली. आता एसएस राजामौली यांनी त्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या आगामी चित्रपटांची नावंही जाहीर केली आहेत.

एसएस राजामौली पाहतायत सध्या 'या' तीन फिल्म्सची वाट 

एका प्रमोशनल मुलाखतीदरम्यान, जेव्हा राजामौली यांना विचारण्यात आलं की, ते कोणत्या चित्रपटांची वाट पाहत आहेत, तेव्हा त्यांनी तीन चित्रपटांची नावं सांगितली. पहिला चित्रपट ज्युनियर एनटीआरचा प्रशांत नील दिग्दर्शित 'ड्रॅगन' आहे आणि दुसरा चित्रपट अ‍ॅनिमल दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचा 'स्पिरिट' आहे, ज्यामध्ये प्रभास मुख्य भूमिकेत आहे. आणि तिसरा चित्रपट म्हणजे, राम चरणचा 'पेड्डी' जो बुची बाबू सना दिग्दर्शित करत आहे.

View this post on Instagram
 
A post shared by SS Rajamouli (@ssrajamouli)

प्रभासच्या 'स्पिरिट' चित्रपटाचं चित्रीकरण अद्याप सुरू झालेलं नसून, ड्रॅगन आणि पेड्डी या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं आहे. हे तिन्ही चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहेत.   

तिन्ही चित्रपट करणार धुवांधार कमाई 

अलिकडच्या काळात 'सालार', 'केजीएफ' आणि 'पुष्पा 2' सारख्या चित्रपटांच्या कमाईनं हे सिद्ध केलंय की, दक्षिणेकडील चित्रपट जगभरात आणि भारतात बॉलिवूडला मागे टाकत आहेत. राम चरण, प्रभास आणि ज्युनियर एनटीआर हे सर्वच चित्रपट संपूर्ण भारतात स्टार बनले आहेत, त्यामुळे हे चित्रपटही 'पुष्पा 2' प्रमाणे कमाई करतील, अशी अपेक्षा आहे.

राजामौलींचे आगामी चित्रपट 

राजामौली आता महेश बाबूसोबत त्यांच्या आगामी 'SSMB 29' या चित्रपटावर काम करत आहेत. या चित्रपटाचा बराचसा भाग चित्रित झाला आहे. या चित्रपटाद्वारे, प्रियांका चोप्रा अनेक वर्षांनी भारतीय चित्रपटात पुनरागमन करत आहे. या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन देखील महत्त्वाची भूमिका साकारत आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Jaat Box Office Collection: 'जाट' पडला 'छावा'वर भारी, पहिल्या रविवारी बॉक्स ऑफिसवर कमाई धुवांधार; किती कमावले?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
Gold : सोनं आणखी महागणार, 2026 मध्ये सोनं 35 -40 हजारांनी वाढणार? कोणत्या कारणानं सोन्याचे दर भडकणार? जाणून घ्या 
सोनं आणखी महागणार, 2026 मध्ये 30 टक्के दर वाढणार, कोणत्या कारणानं सोन्याचे दर भडकणार? जाणून घ्या 
Yavatmal Bus Accident : चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू  चिरत गेला, दोघांचा मृत्यू, 14 जखमी
चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू चिरत गेला, दोघांचा मृत्यू
Hardik Pandya : हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, गुजरात विरुद्धच्या मॅचचं ठिकाण बदलावं लागलं, आता पांड्याची SMAT मधून एक्झिट, कारण समोर
हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, आयोजकांवर सामन्याचं ठिकाण बदलण्याची वेळ, काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
Mumbai Goregaon Vivek College : गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बुरखा आणि हिजाबबंदीवरून तणाव
Kishori Pednekar on Nashik : साधुसंतांना पुढे करून वृक्षतोड करणार असाल, तर कोणी सहन करणार नाही
Sayaji Shinde PC : झाडं तोडणं साधु संताना पटेल का? सयाजी शिंदे यांचा तपोवनातील वृक्षतोडीवर सवाल
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
Gold : सोनं आणखी महागणार, 2026 मध्ये सोनं 35 -40 हजारांनी वाढणार? कोणत्या कारणानं सोन्याचे दर भडकणार? जाणून घ्या 
सोनं आणखी महागणार, 2026 मध्ये 30 टक्के दर वाढणार, कोणत्या कारणानं सोन्याचे दर भडकणार? जाणून घ्या 
Yavatmal Bus Accident : चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू  चिरत गेला, दोघांचा मृत्यू, 14 जखमी
चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू चिरत गेला, दोघांचा मृत्यू
Hardik Pandya : हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, गुजरात विरुद्धच्या मॅचचं ठिकाण बदलावं लागलं, आता पांड्याची SMAT मधून एक्झिट, कारण समोर
हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, आयोजकांवर सामन्याचं ठिकाण बदलण्याची वेळ, काय घडलं?
Modi-Putin : नरेंद्र मोदी- पुतिन यांचा एकाच कारमधून प्रवास, दोन्ही नेते महाराष्ट्र पासिंग SUV Toyota फॉर्च्यूनरमधून रवाना 
नरेंद्र मोदी- पुतिन यांचा एकाच कारमधून प्रवास, दोन्ही नेते महाराष्ट्र पासिंग SUV Toyota फॉर्च्यूनरमधून रवाना 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने संवैधानिक शिस्त पाळली नाही, निवडणुका पुढे ढकलल्यावरुन हायकोर्ट संतप्त
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने संवैधानिक शिस्त पाळली नाही, निवडणुका पुढे ढकलल्यावरुन हायकोर्ट संतप्त
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी
Embed widget