एक्स्प्लोर

BLOG: ऑसींची कमाल, किवी बेहाल 

अखेर आपल्याकडे नसलेली एकमेव ट्रॉफी ऑस्ट्रेलियन टीमने उंचावून क्रिकेट विश्वावरचं आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलंच. वनडे विश्वचषकाची पाच विजेतेपद जे शोकेसमध्ये अभिमानाने मिरवतायत, ते कांगारु टी-ट्वेन्टीच्या ट्रॉफीपासून एक-दोन नव्हे तर 14 वर्ष वंचित होते. अखेर दुबईत रविवारी त्यांनी बाजी मारलीच. या स्पर्धेतील दोन्ही सेमी फायनल जितक्या थरारक झाल्या होत्या, तशीच अपेक्षा फायनलकडून होती. मात्र अपेक्षाभंगच झाला. म्हणजे 172 चा स्कोर झाला, तेव्हा सामना समसमान पातळीवर वाटत होता. स्टार्कच्या गोलंदाजीवर इतका जबरदस्त प्रतिहल्ला कुणी चढवला नसेल. चार चौकार, एक षटकार एकाच ओव्हरमध्ये ठोकत विल्यमसनने आपले इरादे स्पष्ट केले.

यॉर्कर, स्लोअरवन, स्विंगचं मिश्रण करत प्रतिस्पर्धी फलंदाजांची परीक्षा घेणारा स्टार्कचा स्पार्कच जणू गेला होता. विल्यमसनने जणू ऑसी आक्रमकता काही वेळासाठी अमलात आणली होती. असं असतानाच हेझलवूडने खेळपट्टीचं वाचन उत्तम केलं आणि त्याप्रमाणे गोलंदाजीत मिक्सिंग केलं. स्लोअरवनचा बेमालूम वापर केला. त्याच्या आणि कमिन्सच्या स्पेलने किमान 20 धावांनी किवी टीमची गाडी रोखली. तरीही 172 ची टोटल फायनल मॅचमध्ये चॅलेंजिंग होती. त्यात किवींचं वैविध्यपूर्ण आक्रमण, त्यांची 24 तास अलर्टवर असलेली फिल्डिंग यामुळे हे लक्ष्य आणखी कठीण ठरणार होतं. त्यात दुसऱ्या सत्रात काय होणार, दव पडणार का, खेळपट्टी फिरकीला साथ देणार का, अशा अनेक प्रश्नांनी मनात काहूर केलं. पण, ऑस्ट्रेलियन आक्रमकतेने वॉर्नरच्या रुपात मैदानात प्रवेश केला आणि किवी टीमची दाणादाण उडाली.

अगदी फिंचची विकेट गेल्यावरही कुठेही असं वाटलं नाही, की, कांगारुंवर दबाव पडतोय. मिचेल मार्श तिसऱ्या नंबरवर येऊन जी इनिंग खेळला, ती अनेक वर्ष स्मरणात राहील. डेव्हिड व़ॉर्नर त्याच्या नेहमीच्या धडाक्यात फलंदाजी करत असताना मार्शने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत अशी काही सुरुवात केली की, जणू तो ड्रेसिंग रुममध्येच सेट होऊन आला असं वाटावं. आमच्या लाईव्ह शोमध्ये माजी कसोटीवीर प्रवीण अमरे तसं म्हणालेदेखील. ऑस्ट्रेलियाने एक बाब स्मार्टली केली, त्यांनी बोल्टच्या दोन ओव्हर्समध्ये फक्त आठ रन्स केल्या. कोणतीही रिस्क न घेता. बोल्टचा लेफ्ट आर्म स्विंग त्यांनी संयमाने खेळून काढला. इथे चोरी करायला गेलो तर पकडले जाऊ, म्हणून त्यांनी एक-दोन धावांवरच गुजराण केली, दुसरीकडे मात्र त्यांनी चोरी नव्हे तर दरोडा टाकला.

साऊदीच्या 3.5 ओव्हर्समध्ये 43 रन्स तर, सोधीच्या 3 ओव्हर्समध्ये 40 रन्सची लूट ऑसी टीमने केली. अटॅक इज द बेस्ट वे ऑफ डिफेन्सचं सूत्र पाळून याआधीही कांगारुंनी खेळ केल्याचं आपण पाहिलंय. त्याचंच दर्शन यावेळीही घडलं. एकाही क्षणी फायनलमधील धावांच्या पाठलागाचं दडपण ऑसी जोडीवर जाणवलं नाही. पुन्हा एकदा एक ओव्हर आधीच त्यांनी मॅच आणि ट्रॉफीही खिशात घातली. ऑस्ट्रेलियाच्या या विजेतेपदाचं खास कौतुक अशासाठी आहे की, या टूर्नामेंटमध्ये प्रवेश करताना विजेतेपदाचे दावेदार म्हणून त्यांचं नाव फारसं कोणी घेतलं नव्हतं. भारत,  इंग्लंड तसंच न्यूझीलंड यांनाच जास्त पसंती देण्यात येत होती. त्यातच ऑस्ट्रेलियाला इंग्लंडकडून साखळी फेरीत मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. आधी 125 धावांत खुर्दा आणि इंग्लंडने 11.4 ओव्हर्समध्ये गाठलेलं सहज गाठलेलं लक्ष्य हा त्यांना जोर का झटका होता.

या धक्क्यातून सावरत त्यांनी आपला खेळ उंचावत नेला, खास करुन नॉक आऊट स्टेजला इनफॉर्म पाकिस्तानविरुद्धची सेमी फायनल त्यांनी ज्या परिस्थितीतून जिंकली, ती कामगिरी अफलातून होती. त्यांचं टीम सिलेक्शन, बॅटिंग ऑर्डरचं कॅलक्युलेशन अप्रतिम होतं. म्हणजे मार्श, स्टॉईनिससारखे ऑलराऊंडर्स त्यांनी प्लेईंग इलेव्हनमध्ये सातत्याने निवडले. स्टीव्ह स्मिथसारखा दादा बॅट्समन टीममध्ये असूनही फायनलला लवकर विकेट गेल्यावर त्यांनी मार्शच्या टॅलेंटला बॅक केलं नंबर तीनवर बॅटिंगसाठी उतरवलं, मार्शनेही विश्वास सार्थ ठरवला. झॅम्पाने फिरकी आक्रमणाचा भार समर्थपणे वाहिला. वॉर्नरने आयपीएलची निराशा आपल्या आणि त्याच्याही मेमरीतून डिलीट केली. अविश्वासाचा, दबावाचा व्हायरस त्याने आपल्या खेळात येऊच दिला नाही.

सेमी फायनल आणि फायनलमध्ये केलेल्या दोन खेळी त्याच्या गुणवत्तेची आणि क्षमतेची साक्ष देणाऱ्या होत्या. टीकाकारांना ऑसी शैलीतलं ते खणखणीत उत्तर होतं. ‘फिअरलेस’ क्रिकेट म्हणजे काय, अपोझिशनला चिरडण्यासाठी देहबोली कशी असावी, याचं एक्झिबिशन म्हणजे वॉर्नरची खेळी आणि त्याचा मैदानातील वावर होता. मार्श मात्र सरप्राईज पॅकेज होतं. न्यूझीलंडच्या गोलंदाजीवर त्याने पहिल्यापासून चढवलेला हल्ला कदाचित विल्यमसनला आणि त्याच्या टीमलाही अनपेक्षित होता.

वॉर्नरच्या आक्रमणाने काम सोपं केलं, मार्शने विजयपथावर नेईपर्यंत मैदान सोडलं नाही, मॅक्सवेलनेही मग वाहत्या स्कोरमध्ये बॅट धुवून घेतली. अगदी एकाच वाक्यात जर वर्णन करायचं झालं तर, ऑस्ट्रेलियन टीमची कमाल आणि किवी झाले बेहाल, अशीच कहाणी फायनलमध्ये पाहायला मिळाली.

संबंधित ब्लॉग- 

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget