एक्स्प्लोर

हुरडा : महाराष्ट्राच्या चवीची ऐतिहासिक ओळख 

शहरी लोकांमध्ये ‘हुरडा’ म्हणून सरसकट खाल्या जाणाऱ्या ज्वारीमधेही सुरती, दगडी सारख्या अनेक जाती आहेत. पण त्यातही स्पेशली हुरड्यासाठी म्हणून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि नगर जिल्ह्यातील जामखेडमधे पिकणाऱ्या ज्वारीची चवच न्यारी.

थोरले बाजीराव लढाईवर जात असताना वाटेत जेवायला न थांबता, घोड्यावर बसल्याबसल्या वाटेतल्याच शेतातल्या जोंधळ्यांची कणसं खात मजल दरमजल करत पुढे जात; अशी आख्यायिका ऐकलीच असेल. आजकाल शहरातील लोक डिसेंबर-जानेवारीत गाड्या काढून याच जोंधळ्यांचा (ज्वारीचा) हुरडा खायला आसपासच्या गावांकडे कूच करतात. फरक फक्त एकच, थोरले बाजीराव स्वराज्यासाठी लढाईवर जायचे, आताचे आपले लोक याच हुरड्याच्या निमित्ताने आपल्या परिवारासोबत एक दिवस मजेत घालवायला जातात. त्यात वाईट काहीच नाही तर काही गोष्टी काळानुरुप बदलून नव्या रुपात परत येतात, ही त्यापैकीच अजून एक गोष्ट. ‘हुरडा’ या नावाशी अजिबातच परिचय नसलेला माणूस मराठी म्हणवला जाणे अवघडे. तरीही ‘हुरडा’ या संज्ञेशी अगदीच अनभिज्ञ असणाऱ्यांसाठी हुरडा म्हणजे ज्वारीच्या “कवळ्या कणसांतून काढलेले दाणे”. khadadkhau meher-hurda accompli ऐसपैस पसरलेल्या शिवारातली मोकळी जागा, आसपासच्या झाडांना धग न लागेल अश्या बेतानी पेटवलेली शेकोटीसदृश भट्टी. त्यात ज्वारीची खुडलेली कणसं भाजून मोकळे झालेले ज्वारीचे काळे झालेले,कोवळे हिरवे दाणे आग्रहानी वाढणारे शेतातले गांधीटोपीधारी कामकरी. तो ताजा हुरडा हातातल्या कागदी किंवा तत्सम प्लेटमध्ये घेत, आवडीप्रमाणे सोबतच्या मुबलक तिखट-आंबट-गोड चटण्या, तिळाच्या रेवड्या, जत्रेत मिळणाऱ्या गोड शेवगाठींसारख्या (मालवणी-कोकणीत ज्याला खाज्या म्हणतात) अनेक गोष्टींबरोबर चवीने खात आपल्या कुटुंब-मित्रपरिवारासोबत गप्पा मारत खाणारे ग्रुप्स हे डिसेंबर-जानेवारीत लहानमोठ्या शहरांच्या आसपास दिसणारे अगदी कॉमन दृश्य झालं आहे. khadadkhau meher-hurda people-compressed अगदी दहाबारा वर्षांपूर्वीपर्यंत हाच हुरडा खायला लोकं पुण्यातून अहमदनगरच्या पांजरपोळ किंवा औरंगाबाद किंवा अगदी सोलापूरजवळ जायची. सांगितलं तर आश्चर्य वाटेल. हुरड्याची वाढती डिमांड लक्षात घेऊन गेले 9-10 वर्ष पुण्याच्या आसपासच अशी अनेक ‘हुरडा डेस्टिनेशन्स’ तयार झाली आहेत. ‘अॅग्रो टूरीझम’ बाबतीत सजग असणाऱ्या पुण्यालगतच्या सासवड, मोरगाव, इंदापूर, खुटबाव, यवत, थेऊर किंवा पुणे-सातारा रस्त्याजवळच्या काही ठिकाणी या सिझनला सहकुटुंब हुरडा पार्ट्या रंगतात. ‘ऑन पब्लिक डिमांड अँड बजेट’ त्यात भर पडते ती कुडमुडे भविष्य सांगून लोकांचे मनोरंजन करणाऱ्या किंवा वासुदेवांसारखे परंपरा जपणारे लोक आणून मुलांना आपल्या संस्कृतीची नव्याने ओळख करून देण्याची. बैलगाडी/ट्रॅक्टर राईड्स, मैदानी खेळांपासून अगदी पपेट शोज, पार्टी गेम्स, डीजे, रेन डान्स आणि इतरही अनेक निरनिराळ्या रिक्रिएशन अॅक्टीव्हीटीजची. khadadkhau bailgadi-compressed पण मूळ हुरड्याचा विषय लक्षात घ्यायचा असेल तर, पुण्याच्या आसपास ज्वारीचं प्रमाण तसे कमी असल्याने बहुतेक ‘हुरडा डेस्टिनेशन’वर कणसं आधी नगर मग औरंगाबादकडूनही मागवली जायला लागली. काळ बदलला तसे गेल्या काही वर्षांपासून औरंगाबादजवळ वाढत्या औद्योगिकरणामुळे जमिनीचे भाव वाढत गेलेत. त्यातूनही ऊस, सोयाबीनसारख्या पिकांमुळे ज्वारीच्या शेतीचं प्रमाण तसेही कमी व्हायला लागलं. उद्योगांमध्ये होणाऱ्या केमिकल्सच्या वाढत्या वापरामुळे आणि त्याहीपेक्षा त्याच्या निसर्गात होणाऱ्या निचऱ्यामुळे जमिनीचा कस आपोआप कमी होत गेला. त्यामुळे आजकाल पुण्यात सोलापूर किंवा मराठवाड्यातील अजून लांबच्या जिल्ह्यातून वाढत्या प्रमाणात हुरडा यायला लागलाय. मराठवाड्यातील लातूरसारख्या जिल्ह्यात शेणखतासारख्या सेंद्रिय खतांचा वापर करून ज्वारीचे पीक आजही मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. शहरी लोकांमध्ये ‘हुरडा’ म्हणून सरसकट खाल्या जाणाऱ्या ज्वारीमधेही सुरती, दगडी सारख्या अनेक जाती आहेत. पण त्यातही स्पेशली हुरड्यासाठी म्हणून सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, बार्शी आणि नगर जिल्ह्यातील जामखेडमधे पिकणाऱ्या ज्वारीची चवच न्यारी. सहज गंमत म्हणून बोलायचं झालं तर, आंब्यांमधे जो दर्जा देवगड-रत्नागिरी हापूसला दिला जातो तोच दर्जा जाणकार लोक, मंगळवेढा-बार्शीमधल्या ‘मालदांडी’, ‘गुळभेंडी’ हुरड्याला देतात. भाजून झाल्यावरही हिरवा रंग न सोडणारा, दाताखाली आला की ज्वारीचा गोडवा देणारा गुळभेंडी, मालदांडी हुरडा म्हणजे हुरडयांचे सरताज. पण तुलनेने कमी पाऊस असणाऱ्या या तालुक्यात सेंद्रीय शेतीमुळे चांगला कस टिकलेल्या जमिनीमधे, ज्वारीची 8-10 फूट वाढलेली शेतं डोळ्यानाही तेवढीच सुखावतात. आपल्या शेतात पिकलेल्या ज्वारीची हीच कणसं पुण्याच्या जवळ आणून ती शेतातच भट्टी बनवून भाजणाऱ्या शेकडो कुटुंबांना या सिझनला होणाऱ्या हुरडा पार्ट्या, दोन महिन्यात संपूर्ण वर्षभराचा रोजगार देऊन जातात. सहज आठवतोय म्हणून घडलेला किस्सा सांगतो, लक्ष्मी रस्त्याच्या फूटपाथवर साधारण कुंटेचौकापासून उंबऱ्या गणपती चौकापर्यंतच्या भागात दरवर्षी एक माणूस संध्याकाळी सोबतच्या टोपलीत हिरवा रंग लावून आणलेले लहान आकाराचे ज्वारीचे दाणे विकतो. 3-4 वर्षांपूर्वी एका संध्याकाळी लक्ष्मी रस्त्याला फिरताना बालपणापासून चांगला हुरडा खात आलेले, आता पुण्यात स्थायिक झालेले पण मूळचे सोलापुरी असलेले माझे मित्र महेश गजेंद्रगडकर ह्यांनी हुरडयाचा मुलामा दिलेली रंग दिलेली ती ज्वारी झटक्यात ओळखली. त्यांना आपली चोरी लक्षात आल्यावर चोर अचानक ‘गरीब माणूस’ बनून गयावया करायला लागला. खोटा हुरडा विकून असे फसवणूक करणारे आपल्या आसपास असतातच. जशा अपप्रवृत्ती असतात तशा ‘अॅग्रो टूरीझम’ विषयात हुरडा हा आकर्षणाचा मुद्दा बनवून त्याचे चांगल्या मार्गाने यशस्वी मार्केटिंग करणारे लोकही आपल्या भवताली दिसतात. व्यवसायाने प्रथितयश सीए आणि हाडाच्या उद्योजक असलेल्या मित्र श्री.यशवंत कासार, त्यांचे आईवडील आणि समस्त कुटुंबियांनी सुमारे तीन वर्षांपूर्वी यवतजवळ स्वतःच्या शेतात असेच मराठमोळं डेस्टिनेशन सुरु केलंय. हुरड्याच्या निमित्ताने संपूर्ण परिवाराने इथे येऊन अख्खा दिवस आनंदात एकत्र घालवावा, त्यांना ग्रामीण संस्कृतीची ओळख व्हावी या इच्छेने, अथक प्रयत्नांनी आणि भरघोस भांडवल ओतून सबंध परिवाराला दिवसभर क्वालिटी टाईम देणारे ‘जंक्शन’ काम निर्माण केलंय. हुरडा : महाराष्ट्राच्या चवीची ऐतिहासिक ओळख  मराठवाड्यातले आमचे मित्र श्री.तानाजी शेळके या सिझनला लातूरवरून पुण्यात हुरडा आणून, एम्प्रेस गार्डनसारख्या काही ठिकाणी हुरड्याची भेळ, वडे, थालीपीठ असे चविष्ट जिन्नस करून विकतात. व्यवसाय करताना त्यांच्या माध्यमातून गावाकडच्या अनेक लोकांना ते रोजगारही निर्माण करून देत आहेत. आमच्या कासार कुटुंबियांसारख्या, तानाजी शेळके ह्यांच्यासारखे अनेक परिवार, व्यक्ती वेगवेगळ्या गावात हुरड्याच्या निमित्तानी एकंदर महाराष्ट्रातीलच शेती पर्यटनाला वेगळ्या उंचीला नेत आहेत. पण व्यवसाय करताना या आमच्या मित्रांच्याही नकळत त्यांच्यामुळे एक मराठी पदार्थ कॉस्मोपॉलिटिन लोकांनाही माहिती होतोय, आवडतोय. त्या पदार्थांचे नकळत ब्रँडिंग होतंय ह्याचा व्यवस्थापनाचा विद्यार्थी आणि एक उद्योजक म्हणून मला तेवढाच अभिमान वाटतो. (लेखातील मते लेखकाची वैयक्तिक आहेत) खादाडखाऊ सदरातील इतर ब्लॉग : खादाडखाऊ : सवाईतल्या फूड स्टॉलचा अनुभव खादाडखाऊ : सुरेल सवाईला ‘फक्कड’ करणार चविष्ट, तेही पर्यावरणपूरक मार्गाने खादाडखाऊ : वहुमनचा बाबाजी खादाडखाऊ : पुण्यातले इराणी मित्रो !!! आज खिचडी पुराण खादाडखाऊ : दिवाळीनंतरचे ‘ओरीजनल’ मराठी चटकदार पदार्थ खादाडखाऊ : दिवाळीची खरेदी अन् पुण्यातील खवय्येगिरी!   खादाडखाऊ : अटर्ली बटर्ली पण फक्त डिलीशअस? खादाडखाऊ : जखमा उरातल्या खादाडखाऊ : चायनीज गाड्यांवरचे खाणे आणि अर्थकारण वडापाव -काही आठवणीतले, काही आवडीचे खादाडखाऊ : मराठी पदार्थांसाठी फक्कड खादाडखाऊ : गणेशोत्सवातली खाद्यभ्रमंती आणि बदलत चाललेलं पुणं खादाडखाऊ : गणेशोत्सव आणि मास्टरशेफ खादाडखाऊ : पुण्यातला पहिला ‘आमराई मिसळ महोत्सव’ खादाडखाऊ : खाद्यभ्रमंती मुळशीची खादाडखाऊ : मंदारची पोह्यांची गाडी खादाडखाऊ : आशीर्वादची थाळी खादाडखाऊ : पुण्यातील महाडिकांची गाडी खादाडखाऊ : पुन्हा एकदा लोणावळा खादाडखाऊ : ‘इंटरव्हल’ भेळ आणि जय जलाराम खादाडखाऊ : ‘तिलक’चा सामोसा सँपल खादाडखाऊ : प्रभा विश्रांतीगृहाचा अस्सल पुणेरी वडा ब्लॉग : खादाडखाऊ : हिंगणगावे आणि कंपनी खादाडखाऊ : पुण्यातील 106 वर्षं जुनी ‘वैद्यांची मिसळ’! खादाडखाऊ: खाद्य इतिहास पुण्याचा
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिवरायांचा अपमान, इंद्रजित सावंतांना धमकी देत फरार झाला, पण अंतरिम जामीन मिळताच प्रशांत कोरटकर व्हिडिओतून प्रकट झाला, पण पोलिसांना अजून सापडला नाही!
शिवरायांचा अपमान, इंद्रजित सावंतांना धमकी देत फरार झाला, पण अंतरिम जामीन मिळताच प्रशांत कोरटकर व्हिडिओतून प्रकट झाला, पण पोलिसांना अजून सापडला नाही!
आई बायकोच्या भांडणात हैराण होऊन गेला, दोन वर्षापूर्वी लग्न केलेल्या तरुणाने धावत्या रेल्वेतून उडी घेतली; म्हणाला, 'भावांनो लग्न करा, पण पहिल्यांदा..'
आई बायकोच्या भांडणात हैराण होऊन गेला, दोन वर्षापूर्वी लग्न केलेल्या तरुणाने धावत्या रेल्वेतून उडी घेतली; म्हणाला, 'भावांनो लग्न करा, पण पहिल्यांदा..'
Dhananjay Munde Resignation: धनंजय मुंडे आज राजीनामा देणार की घेतला जाणार? अर्थसंकल्पीय अधिवेशनात हायव्होल्टेज ड्रामा होण्याची शक्यता
'3-3-2025 को राजीनामा होगा!'; करुणा शर्मांचा शब्द खरा ठरणार, धनंजय मुंडे आजच राजीनामा देणार?
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना फेब्रुवारीच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना फेब्रुवारीच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

9 Scenes Superfast News : 9 सेकंदात बातमी : Superfast News : ABP Majha : Maharashtra NewsBudget Session Assembly : राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, अजित पवारांसमोर कोणती आव्हानं?Raksha Khadse Daughter : रक्षा खडसेंच्या मुलीसह मैत्रिणीची छेड काढणाऱ्या तिघांना अटकTop 70 News : Superfast News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7 AM : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवरायांचा अपमान, इंद्रजित सावंतांना धमकी देत फरार झाला, पण अंतरिम जामीन मिळताच प्रशांत कोरटकर व्हिडिओतून प्रकट झाला, पण पोलिसांना अजून सापडला नाही!
शिवरायांचा अपमान, इंद्रजित सावंतांना धमकी देत फरार झाला, पण अंतरिम जामीन मिळताच प्रशांत कोरटकर व्हिडिओतून प्रकट झाला, पण पोलिसांना अजून सापडला नाही!
आई बायकोच्या भांडणात हैराण होऊन गेला, दोन वर्षापूर्वी लग्न केलेल्या तरुणाने धावत्या रेल्वेतून उडी घेतली; म्हणाला, 'भावांनो लग्न करा, पण पहिल्यांदा..'
आई बायकोच्या भांडणात हैराण होऊन गेला, दोन वर्षापूर्वी लग्न केलेल्या तरुणाने धावत्या रेल्वेतून उडी घेतली; म्हणाला, 'भावांनो लग्न करा, पण पहिल्यांदा..'
Dhananjay Munde Resignation: धनंजय मुंडे आज राजीनामा देणार की घेतला जाणार? अर्थसंकल्पीय अधिवेशनात हायव्होल्टेज ड्रामा होण्याची शक्यता
'3-3-2025 को राजीनामा होगा!'; करुणा शर्मांचा शब्द खरा ठरणार, धनंजय मुंडे आजच राजीनामा देणार?
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना फेब्रुवारीच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना फेब्रुवारीच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Gautam Gambhir : त्यावेळी निर्णय घेताच चर्चा झाली, टीकाही भरपूर झाली, पण टीम इंडियाच्या वस्तादांनी एक डाव राखून ठेवला अन् बरोबर सेमीफायनलपूर्वी टाकला!
त्यावेळी निर्णय घेताच चर्चा झाली, टीकाही भरपूर झाली, पण टीम इंडियाच्या वस्तादांनी एक डाव राखून ठेवला अन् बरोबर सेमीफायनलपूर्वी टाकला!
Pune Crime Swargate: तरुणीला शरीरसंबंधासाठी 7500 रुपये दिले म्हणणाऱ्या दत्तात्रय गाडेच्या बँक खात्यात फक्त 249 रुपये, पोलिसांना मोबाईलमध्ये नेमकं काय सापडलं?
तरुणीला शरीरसंबंधासाठी 7500 रुपये दिले म्हणणाऱ्या दत्तात्रय गाडेच्या बँक खात्यात फक्त 249 रुपये, पोलिसांना मोबाईलमध्ये नेमकं काय सापडलं?
Raksha Khadse: रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड करणाऱ्या तिघांना अटक, एक अल्पवयीनही ताब्यात;  मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर मोठी कारवाई
रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड करणाऱ्या तिघांना अटक, एक अल्पवयीनही ताब्यात; मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर मोठी कारवाई
संतोष देशमुखांना मारहाणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपचं नाव 'मोकारपंती'; आरोपींच्या राक्षसी कृत्याचा खुलासा
संतोष देशमुखांना मारहाणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपचं नाव 'मोकारपंती'; आरोपींच्या राक्षसी कृत्याचा खुलासा
Embed widget