Shukra Nakshatra Gochar : अवघ्या 4 दिवसांनी शुक्राचं नक्षत्र परिवर्तन, 'या' 3 राशी जगतील राजासारखं आयुष्य; प्रत्येक स्वप्न होणार पूर्ण
Shukra Nakshatra Gochar : ज्योतिषीय शास्त्रानुसार, धनत्रयोदशीच्या आधी म्हणजे 27 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी शुक्र ग्रह ज्येष्ठा नक्षत्रात प्रवेश करणार आहे.
Shukra Nakshatra Gochar : ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक अंतराने राशी परिवर्तन करतात. या राशी (Zodiac Signs) परिवर्तनाचा प्रभाव सर्व 12 राशींवर होतो. काही राशींसाठी हा परिणाम शुभ असतो तर काही राशींसाठी हा परिणाम अशुभ असतो. त्यानुसार, सुख-समृद्धी, आणि धन-संपत्तीचा कारक ग्रह म्हणजेच शुक्र (Venus) ग्रह लवकरच नक्षत्र परिवर्तन करणार आहे. सध्या शुक्र वृश्चिक राशीत विराजमान आहे.
धनत्रयोदशीच्या आधीच शुक्राचं राशी परिवर्तन
ज्योतिषीय शास्त्रानुसार, धनत्रयोदशीच्या आधी म्हणजे 27 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी शुक्र ग्रह ज्येष्ठा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. तर, 7 नोव्हेंबर पर्यंत तो या राशीत असणार आहे. शुक्राचं हे नक्षत्र परिवर्तन 3 राशींच्या लोकांसाठी फार शुभ असणार आहे. या राशींच्या लोकांना चांगला धनलाभ होऊ शकतो. तसेच, प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. या 3 लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
सिंह रास (Leo Horoscoep)
शुक्राचं राशी परिवर्तन सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. तुम्हाला पगारात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती झालेली दिसेल. तुम्हाला उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. या काळात तु्म्ही यात्रेला जाण्याचा देखील विचार करु शकता. व्यापारी वर्गातील लोकांसाठी हा काळ फार चांगला आहे.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी शुक्राचं नक्षत्र परिवर्तन शुभ वार्ता घेऊन येणारं आहे. या काळात तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगलं यश मिळेल. तसेच, कामातील सहकाऱ्यांचा चांगला सपोर्ट मिळेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. तसेच, या काळात धनलाभाचे योग जुळून येणार आहेत. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. जर तुम्हाला कोणता आजार असेल तर तो या काळात दूर होईल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात चांगलं यश मिळेल. नोकरदार वर्गातील लोकांच्या पगारात चांगली वाढ झालेली दिसेल. व्यापारी वर्गातील लोकांना चांगली डील मिळेल. तुम्हाला तुमच्या आवडीचा जॉब करण्याची संधी मिळेल. जे लोक नोकरीच्या शोधात फिरतायत त्यांना लवकरच शुभवार्ता मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: