Shani Nakshatra Gochar 2024 : वर्षाच्या शेवटीच शनीचं नक्षत्र परिवर्तन; 2024 वर्ष सरता-सरता 'या' 4 राशींवर शनी होणार प्रसन्न
Shani Nakshatra Gochar 2024 : शनी सध्या राहूच्या शतभिषा नक्षत्रात विराजमान आहे. पण, 27 डिसेंबरला शनी नक्षत्र परिवर्तन करुन पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे.

Shani Nakshatra Gochar 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनी (Shani Dev) ठराविक वेळेनुसार आपल्या राशीत परिवर्तन करतात. सध्या शनी (Lord Shani) कुंभ राशीत विराजमान आहे. शनी शतभिषा नक्षत्रात संक्रमण करतोय. तर, डिसेंबर महिन्यात शनी नक्षत्र परिवर्तन करणार आहे. याचा परिणाम सर्व 12 राशींवर (Zodiac Signs) होणार आहे.
शनी सध्या राहूच्या शतभिषा नक्षत्रात विराजमान आहे. पण, 27 डिसेंबरला शनी नक्षत्र परिवर्तन करुन पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. शनीच्या या नक्षत्र परिवर्तनामुळे कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
शनी पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करुन या राशीच्या अकराव्या चरणात असणार आहे. या राशीत शनी विराजमान असल्यामुळे तुम्हाला कोणत्या ना कोणत्या प्रकारचा लाभ नक्की मिळेल. तसेच, तुमची अनेक काळापासून रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. घर, संपत्ती किंवा वाहन खरेदी करण्यासाठी हा काळ चांगला आहे. या दरम्यान स्वार्थी लोकांपासून दूर राहा. ते तुमचा फायदा घेऊ शकतात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
या राशीत शनी दहाव्या चरणात विराजमान आहे. या काळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला लाभ मिळेल. तुमच्या भौतिक सुख-समृद्धीत चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, या काळात तुमच्या आयुष्यात अनेक बदल घडू शकतात. कुटुंबियांबरोबर आनंदात वेळ जाईल.
कन्या रास (Virgo Horoscope)
पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश केल्याने शनी सहाव्या चरणात विराजमान आहे. या नक्षत्रात प्रवेश करुन तुम्हाला विशेष लाभ मिळणार आहे. तसेच, जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळू शकते. व्यापारी वर्गातील लोकांना नोकरीत चांगला लाभ मिळेल. तुमच्या सुख-समृद्धीत चांगली वाढ झालेली दिसेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
या राशीच्या चौथ्या चरणाक शनी विराजमान असणार आहे. त्याचबरोबर शनी गुरुच्या नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्यामुळे या राशीचे लोक या काळात नवीन कार्याची सुरुवात करु शकतात.तसेच, तुमच्या व्यवसायात तुमची चांगली वाढ होईल. प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या व्यवसायाचा चांगला मोठा विस्तार होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Astrology : आज समसप्तक योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; मेषसह 'या' 5 राशींच्या आर्थिक समस्या होतील दूर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
