Astrology : आज त्रिवेणी योगासह जुळून आले अनेक शुभ योग; 3 राशींना होणार फायदाच फायदा, उत्पन्नाच्या नव्या संधी येणार चालून
Panchang 28 January 2025 : आज मंगळवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, या दिवशी त्रिवेणी योग निर्माण झाल्याने याचा सर्वाधिक लाभ 3 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology Panchang 28 January 2025 : आज मंगळवार, 28 जानेवारी रोजी मंगळ मिथुन राशीत प्रवेश करेल. आज पौष कृष्ण पक्षाचील चतुर्दशी तिथी असून आज दुर्मिळ असा त्रिवेणी योग तयार झाला आहे, जो 3 राशींसाठी फायद्याचा ठरेल. आज दुपारपासून चंद्र मकर राशीत प्रवेश करेल आणि बुध आणि सूर्यासोबत युती करुन त्रिवेणी योग निर्माण करेल. तर आज पूर्वाषाढानंतर उत्तराषाढ नक्षत्राचा प्रभाव राहील, यासोबत आज वज्र योगही तयार होईल. या योगांमुळे आजचा दिवस 3 राशींसाठी भाग्याचा असणार आहे. या लकी राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मिथुन रास (Gemini)
आज मिथुन राशीच्या लोकांसाठी व्यवसाय आणि नोकरीच्या दृष्टीने खूप चांगला दिवस असेल. तुमच्या व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल. आज तुम्हाला कुठूनतरी अनपेक्षित लाभही मिळू शकतो. नोकरीत तुमचा आदर आणि प्रभाव वाढेल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली संधी मिळेल. तुम्ही नवीन योजनेवर काम सुरू करू शकता. जर तुम्ही बँकेकडून कर्ज घेण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला त्यात यश मिळेल. तुम्ही कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तुमचं कौटुंबिक जीवन देखील आज आनंदी असेल.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांसाठी आज 28 जानेवारीला बनत असलेला त्रिवेणी योग शुभ ठरेल. आज त्यांना त्यांच्या कामात आणि प्रयत्नांमध्ये तिप्पट फायदा होईल. ज्याच्याकडून तुम्हाला अपेक्षा नसेल अशा व्यक्तीकडून तुम्हाला मदत मिळू शकते. तुम्हाला कुठूनतरी अचानक पैसे मिळू शकतो, ज्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील. न्यायालयीन खटल्यांमध्ये अडकलेल्यांच्या बाजूने काही निर्णय येऊ शकतो. राजकीय क्षेत्रातील लोकांना त्यांच्या कामात यश मिळेल. आज तुम्ही काही नवीन कामही सुरू करू शकता. तुमची एखादी घरगुती समस्याही आज दूर होईल.
कुंभ रास (Aquarius)
आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभ आणि फलदायी ठरेल. तुमच्या व्यावसायिक योजनेत तुम्हाला यश मिळेल. खूप दिवसांपासून प्रलंबित असलेलं कोणतंही महत्त्वाचं काम पूर्ण होऊ शकतं. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना यश मिळेल. आज आयात-निर्यातीच्या कामातही यश मिळेल. आज तुमच्या नोकरीत अधिका-यांशी समन्वय राखल्याने तुम्हाला फायदा होईल आणि पदोन्नतीची संधी मिळेल. भागीदारीत काम करणाऱ्यांना आज भागीदारांच्या मदतीचा फायदा होईल. तुमचं कौटुंबिक जीवन देखील आज आनंदी असेल. काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
