एक्स्प्लोर

Astrology : आज सौभाग्य योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; देवी लक्ष्मी 'या' 5 राशींवर होणार प्रसन्न

Astrology Panchang 13 September 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम 5 राशींना मिळणार आहे. तुमच्या कुंडलीतील शुक्राची स्थिती चांगली असल्याने आज चांगले परिणाम मिळतील.

Astrology Panchang 13 September 2024 : आज शुक्रवार 13 सप्टेंबरचा दिवस ग्रहांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा असणार आहे. आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील शुक्ल तिथीची दशमी तिथी आहे. तसेच, आज सौभाग्य योग (Yog), शोभन योग आणि पूर्वाषाढ नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम 5 राशींच्या लोकांना मिळणार आहे. या दरम्यान तुमच्या कुंडलीतील शुक्राची स्थिती चांगली असल्या कारणाने आज चांगले परिणाम मिळतील. अनेक सुख-सुविधा प्राप्त होतील. या पाच राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. आज तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ दिसून येईल. तसेच, तुम्ही जे कार्य हाती घ्याल त्यात तुम्हाला यश मिळेल. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील त्या तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडणं गरजेचं आहे. तसेच, गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांचा आजचा दिवस संतोषजनक असणार आहे. आजच्या दिवसांत तुम्ही जो निर्णय घ्याल त्यावर तुम्ही ठाम असणं गरजेचं आहे. तसेच, तुम्ही केलेल्या कामामुळे समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. विद्यार्थी परीक्षेत किंवा स्पर्धेत भाग घेतल असतील तर या दरम्यान त्यांची बौद्धिक क्षमता दिसून येईल. भविष्यात करिअरच्या उच्च संधी निर्माण होतील. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे. देवी लक्ष्मीचा तुमच्यावर आशीर्वाद असल्या कारणाने तुमची सर्व कार्य अगदी सुरळीतपणे पार पडतील. विविध स्त्रोतांतून तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची काही गरज नाही. धार्मिक कार्यादरम्यान तुमचा पैसा खर्च होऊ शकतो पण याचा देखील तुम्हाला नंतर लाभच मिळणार आहे. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. आज नशिबाची साथ तुम्हाला मिळेल. तसेच, तुमच्या दिवसाची सुरुवात फार चांगली होणार आहे. तुम्ही करत असलेल्या कार्याचा प्रचार सर्वदूर होईल. तुमची किर्ती वाढेल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांवर कामाच्या ठिकाणी नवीन योजना सोपवल्या जातील. गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. 

धनु रास (Sagittarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी फार फलदायी असणार आहे. देवी लक्ष्मी आणि गणपतीच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा लवकरच पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी वातावरण प्रसन्न असल्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. तसेच, जोडीदाराबरोबर चांगले संबंध राहतील. नात्यात गोडवा वाढेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Horoscope Today 13 September 2024 : आज शुक्रवारचा दिवस कोणत्या राशीसाठी ठरणार लकी? वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget