एक्स्प्लोर

तब्बल 33 एकरात लावला कांदा! बीडच्या शेतकऱ्याच्या अजब धाडसाची गावभर चर्चा, 90 लाखांची अपेक्षा

या शेतकऱ्याला ९० लाख रुपयांची अपेक्षा असून कांदा पिकाकडून सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनीच आशा सोडल्याचे चित्र असताना बीडच्या या तरुणाच्या धाडसांचं जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही नवल वाटतंय.

Beed: बीडसारख्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यात बघाल तिथे कांदा असं चित्र दिसणं तसं कठीणच. सोयाबीन, बाजरी, चारा अशी पारंपरिक शेती करणाऱ्यांचंच प्रमाण अधिक. कांदा निर्यातशुल्कामध्ये कांद्यांचे भाव घसरल्याने राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं. इथून पुढं एक दोन एकरात तरी कांदा लावायचा का नाही अशा संभ्रमात शेतकरी असताना बीडमधील आष्टी तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने त्याच्या तब्बल ३३ एकराच्या शिवरात फक्त कांद्याचीच लागवड (Onion cultivation) करून टाकलीये. या शेतकऱ्याची सध्या मोठी चर्चा असून जिल्ह्यातील शेतकरीही याकडे आश्चर्यानंच पहाताना दिसतायत.

पंकज पठाडे या युवा शेतकऱ्यानं  १५ लाख रुपये खर्च करून तब्बल ३३ एकरावर कांदा लागवड केली आहे. मागील दहा दिवसांपासून आष्टीच्या या शेतकऱ्याच्या शेतावर १०० हून अधिक महिलांसह आणि अनेक मजूरांची रेलचेल आहे. जून महिन्यात सात आठ एकरांसाठी तयार केलेल्या कांद्याच्या रोपांची लागवड करण्यात हे सगळे  मजूर सध्या व्यस्त आहेत. या शेतकऱ्याला ९० लाख रुपयांची अपेक्षा असून कांदा पिकाकडून सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनीच आशा सोडल्याचे चित्र असताना बीडच्या या तरुणाच्या धाडसांचं जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही नवल वाटतंय.

९० लाखांच्या कमाईची अपेक्षा

युवा शेतकरी पंकज पठाडेंना कांद्याच्या पिकातुन मोठी आशा आहे. आता जवळपास २० ते २२ एकरात त्यांची कांदा लागवड पूर्ण झाली असून ३३ एकरातून येणाऱ्या कांद्याकडून त्यांना ९० लाख रुपये मिळतील अशी अपेक्षा आहे. यासाठी त्यांनी १०० हून अधिक महिला मजूरांना या कामासाठी नेमलंय. मजुरांना रोजचा खर्च द्यायचा म्हटला तरी आठवड्याचा खर्च ७० ते ८० हजाराच्या घरात जाणारा. सिंचनासाठी या शेतकऱ्याने शिवारात ड्रिप बसवले आहे. त्यासाठी साधारण ८ ते १० लाख खर्च आला असून आतापर्यंत असा १८ ते २० लाख रुपये या शेतकऱ्याचा एकूण खर्च आहे. यातून त्याला साधारण ९० लाख रुपये कमाईची अपेक्षा आहे.

100 हून अधिक महिला कामगारांची लागवडीसाठी नेमणूक

या शेतकऱ्यानं १०० हून अधिक महिलांसह अनेक मजूरांना कांदा लागवडीसाठी नेमलंय. सध्या रोज सकाळपासून हे सगळे मजूर पंकज पठाडेंच्या शेतात लागवडीसाठी येतात. सध्या २० ते २२ एकरावर कांदा लागवड पूर्ण झाली असून शेतकऱ्याच्या धाडसाचं फळ त्याला मिळतंय का? हे येणारा काळच ठरवेल.

हेही वाचा:

बांगलादेशच्या अराजकतेचा हळद निर्यातीवर परिणाम, हिंगोलीतील शेतकऱ्यांचं पेमेंट थांबलं, व्यापारीही संभ्रमात

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai University : मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget