एक्स्प्लोर

बांगलादेशच्या अराजकतेचा हळद निर्यातीवर परिणाम, हिंगोलीतील शेतकऱ्यांचं पेमेंट थांबलं, व्यापारीही संभ्रमात

आता बांगलादेशात हळद निर्यात करायची की नाही याविषयी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असून निर्यात कंपन्याही बांग्लादेशात हळद पाठवण्यात धजावत नसल्याचे समोर येतंय.

turmeric Export: बांगलादेशातील अराजकतेमुळं महाराष्ट्रातील हळीदीच्या निर्यातीवर मोठा परिणाम झाल्याचं समोर येतंय. हिंगोली जिल्ह्यातून दररोज साधारण १५० टन हळदीची बांगलादेशात निर्यात होत असते.मात्र आता बांगलादेशात ओढावलेल्या अराजकतेमुळे  हळद निर्यात पूर्णपणे ठप्प झाल्याचे चित्र आहे. हिंगोलीतील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला असून हळदीचे पूर्ण पेमेंट थांबल्याचे सांगण्यात आले आहे. आता बांगलादेशात हळद निर्यात करायची की नाही याविषयी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असून निर्यात कंपन्याही बांग्लादेशात हळद पाठवण्यात धजावत नसल्याचे समोर येतंय.

जागतिक बाजारपेठेत हिंगोलीच्या हळदीची निर्यात अधिक

जागतिक बाजारपेठेत ८० टक्के हळद ही भारतातून पाठवली जाते. यात महाराष्ट्रातून बांग्लादेशासह इतर आखाती राष्ट्रांमध्ये हिंगोलीतून हळद निर्यातीचे प्रमाण मोठे आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून हळदीचा भाव मोठ्या प्रमाणात घसरला असून हिंगोलीच्या हळद मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर हळद पडून आहे. काल हळदीचे भाव साधारणता १००० ते १२०० रुपयांनी घसरलेले आहेत. पुढील महिनाभर भाव घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी साधारणता एक महिन्याचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली आहे.

हिंगोली हळद लागवडीचे एकूण क्षेत्र किती?

हिंगोली परिसरात वायगाव प्रतिभा सेलम या जातीच्या हळदीची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. राज्यात मागील वर्षी हळद लागवडीचे एकूण क्षेत्र सुमारे ८४ हजार ६६ हेक्टर आहे. त्यापैकी एकट्या हिंगोलीत ४९ हजार ७६४ हेक्टर क्षेत्रावर हळद लागवड केली आहे. हे क्षेत्र एकूण क्षेत्राच्या तुलनेत निम्म्याहून अधिक आहे. हळदीचे विक्रमी उत्पादन घेणारा जिल्हा म्हणुन ओळख आहे. येथील हळदीला देशभरातून मागणी असते. जिल्ह्यातील एकूण हळद उत्पादनापैकी २५ ते ३० टक्के हळद बांगलादेशात निर्यात होते. त्या ठिकाणाहून इतर देशांत हळद पोहोचते.

बांगलादेशातील अराजकेमुळे हळद निर्यातीवर परिणाम

हळदीसह कापूस गाठी, सेंद्रिय रसायने, सोयापेंडसह इतरही काही छोटी-मोठी उत्पादनांची बांगलादेशात प्रामुख्याने निर्यात होत असते. त्यामुळे आता जिल्ह्यातून कृषी, सेंद्रिय रसायन उत्पादने हळद निर्यातीसाठी वेगळे धोरण किमान जिल्हास्तरावर आखणे गरजेचे आहे. जिल्ह्याचे अर्थकारण कृषीवर अवलंबून असून औद्योगिकदृष्ट्या विचार होणे आवश्यक असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा:

हिंगाेलीतील कृषी उत्पन्न बाजारसमितीतील मोंढा राहणार 9 दिवस बंद, हळदीची आवक वाढली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघडSaif Ali Khan CCTV : तोंड बांधून दबक्या पावलांनी आला, सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV!Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहितीSaif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
EPFO : पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
Pune Nashik Highway Accident : आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
Sanju Samson : संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
Saif Ali Khan Attacked: 'हा' तो नव्हेच...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरूच
'हा' तो नव्हे...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरू
Embed widget