
Shahbaz Ahmed: हार्दिकला विश्रांती, शाहबाज अहमदला संधी; आयपीएल गाजवणारा अष्टपैलू खेळाडू आहे तरी कोण?
Who is Shahbaz Ahmed: भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs England) यांच्यातील आगामी टी-20 मालिकाला उद्यापासून (28 सप्टेंबर) सुरूवात होणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघात अनेक बदल करण्यात आले आहेत.

Who is Shahbaz Ahmed: भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs England) यांच्यातील आगामी टी-20 मालिकाला उद्यापासून (28 सप्टेंबर) सुरूवात होणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघात अनेक बदल करण्यात आले आहेत. मोहम्मद शामी (Mohammed Shami) अजूनही कोरोनातून सावरला असून त्याच्याऐवजी उमेश यादवचा विचार केला जातोय. तर, पाठीच्या दुखापतीमुळं अष्टपैलू खेळाडू दीपक हुडा (Deepak Hooda) मालिकेतून बाहेर झालाय. दरम्यान, आगामी टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीनं हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्याच्या ऐवजी बंगळुरूचा स्टार युवा अष्टपैलू खेळाडू शाहबाज अहमदला (Shahbaz Ahmed) भारतीय संघात स्थान देण्यात आलंय. आयपीएलच्या मागच्या हंगामात आरसीबीकडून खेळताना त्यानं चांगली कामगिरी करून दाखवली, ज्यानंतर तो प्रकाशझोतात आला.
शाहबाज अहमद आहे तरी कोण?
शाहबाज अहमद देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालकडून खेळतो. त्यानं भारतीय 'अ' संघाचंही प्रतिनिधित्व केलंय. शाहबाज हा स्लो लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स गोलंदाज आहे. तो संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळतो. त्याच्या देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दीवर नजर टाकल्यास तो प्रभावी ठरलाय. शाहबाजनं प्रथम श्रेणी सामन्यांच्या 29 डावांमध्ये 1 हजार 41 धावा केल्या आहेत. ज्यात एक शतक आणि सात अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याच्या नावावर 57 विकेट्सचीही नोंद आहे. शाहबाजनं लिस्ट ए मध्ये 26 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यानं 662 धावा केल्या आहेत. ज्यात दोन शतक आणि दोन अर्धशतकांसह 14 विकेट्सची नोंद आहे.
शाहबाज अहमदची आयपीएलमधील कामगिरी
शाहबाज अहमदनं आयपीएलमध्ये आतापर्यंत 28 सामने खेळले आहेत. ज्यात 18.6 च्या सरासरीनं आणि 118 च्या स्ट्राईक रेटनं 279 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर 13 विकेट्सची नोंद आहे. यादरम्यान, त्याचा इकोनॉमी 8.58 इतका होता. तर, अवघ्या सात धावा देऊन तीन विकेट्स ही त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, शाहबाज अहमद.
भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ:
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, रिसोबा, रिसोबा रुसो, तबरीझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
