Olympic 2024 :पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं पदकाचं खातं उघडणार ?
Olympic 2024 :पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं पदकाचं खातं उघडणार ? सध्या पॅरेसमध्ये होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या स्पर्धेत गेल्या वर्षापेक्षा सरस कामगिरी करण्याचे भारताचे लक्ष आहे. ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे. भारताच्या मनू भाकरनं महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल नेमबाजीत अंतिम फेरीत धडक मारलीय. भारताच्या एका महिला नेमबाजानं तब्बल 20 वर्षांनंतर ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठली आहे. पण मनू भाकरनं एअर पिस्टल नेमबाजीचं पदक जिंकल्यास, ती ऑलिम्पिक पदक जिंकणारी भारताची पहिली महिला नेमबाज ठरणार आहे. त्यामुळे आज तिच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कोण आहे मून भाकर? भारत आज मून भाकरच्या रुपात पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपलं खातं उघडू शकतो. तिने 10 मीटर्स एअर पिस्टल नेमबाजीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. 22 वर्षांची मून भाकर ही मूळची हरियाणातल्या झज्जर तालुक्यातली आहे. मनू भाकरने आपल्या नेमबाजी करिअरमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही तिने आपला ठसा उमटवलेला आहे.