Pune Winter Cold : गुलाबी थंडीने पुणे गारठलं; 7.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
Pune Winter Cold : गुलाबी थंडीने पुणे गारठलं; 7.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. राज्यात भयंकर थंडी आणि गारठा वाढलाय. उत्तरेकडील शीत लहरींमुळे राज्यात पुढील चार दिवसांसाठी थंडीची लाट राहणार असल्याचे हवामान विभागांने सांगितलंय. हाडं गोठवणाऱ्या थंडीने नागरिक हैराण झाले आहेत . दरम्यान आज महाबळेश्वर पेक्षाही पुण्यात कमी तापमान आहे . तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली गेला असून प्रचंड धुक्यामुळे सोलापुरातील विमानसेवा उद्घाटनही पुढे ढकळण्यात आले आहे .
राज्यभरात पहाटेच्या वेळी नीचांकी तापमानाच्या नोंदी होत असून किमान तापमान सरासरीपेक्षा दोन ते सहा अंशापर्यंत खाली घसरल्याचं दिसून येत आहे .आज महाबळेश्वर मध्ये 13.5 अंश तापमान होतं .तर पुण्याचा पारा 7.8 अंश सेल्सिअसवर होता. यात NDA परिसरात 6.1° वर तापमान होतं . राज्यात थंडीचा कडाका वाढत असून पुणे, नाशिक आणि लातूरसह अनेक भागांत तापमानाची घसरगुंडी झालीय. पुण्याचं तापमान महाबळेश्वरपेक्षाही कमी झालं असून सोलापूरमध्ये धुक्यामुळे विमानसेवेच्या उद्घाटनावर पाणी फेरले आहे. देशात उत्तरेतून येणाऱ्या शीत लहरी आता आणखी तीव्र झाल्या आहेत. जम्मू काश्मीरसह उत्तरेकडील बहुतांश राज्यांमध्ये शुन्याखाली तापमान गेलं आहे. भारतीय हवामान विभागानं मध्य महाराष्ट्रासह विदर्भ,मराठवाड्यात तीव्र थंडीच्या लाटेचा इशारा (Cold Wave Alert) दिला आहे. येत्या 24 तासांत राज्यात 3 ते 5 अंशांनी तापमान घटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.