ABP Majha Headlines : 9 PM : 23 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
दलित असल्यामुळंच सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा गंभीर आरोप, सूर्यवंशी आणि वाकोडे कुटुंबीयांचं सांत्वन, मुख्यमंत्री विधीमंडळात खोटं बोलल्याची टीका...
परभणी आणि बीड दोन्ही घटनांमध्ये मुख्यमंत्री खोटं बोलले, त्यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार, पटोलेंचा इशारा...तर राहुल गांधींची परभणी भेट राजकीय, फडणवीसांचा हल्लाबोल...
बीडमध्ये पोलिसांचेच गुंडांशी लागेबांधे, संतोष देशमुखांच्या कुटुंबियांच्या भेटीनंतर शिरसाटांचा हल्लाबोल...उदय सामंत आणि मेघना बोर्डिकरांनीही घेतली देशमुख कुटुंबाची भेट
भुजबळांना केंद्रात मोठी संधी देण्याची अजित पवारांची इच्छा, देवेंद्र फडणवीसांची माहिती.. भुजबळ भाजपात येणार नसल्याचंही केलं स्पष्टीकरण...
छगन भुजबळांची नाराजी हा पक्षांतर्गत विषय, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा एका वाक्यात खुलासा, भुजबळ-फडणवीस भेट खटकल्याची चर्चा.
दालनाच्या पाठोपाठ महायुतीच्या मंत्र्यांना बंगल्यांचंही वाटप...चंद्रशेखर बावनकुळेंना रामटेक, राधाकृष्ण विखेंना रॉयलस्टोन, पंकजा मुंडेंना पर्णकुटी, शंभूराज देसाईंना मेघदूत, तर गणेश नाईकांना पावनगड बंगला...
पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता, पूजा खेडकरने फक्त UPSCच नाही तर संपूर्ण समाजाची फसवणूक केल्याचे कोर्टाचे ताशेरे
पंतप्रधान आवास योजनेतल्या जाचक अटी हटवणार, केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहानांची घोषणा...मोबाईल आणि दुचाकी असणाऱ्यांनाही फायदा...महाराष्ट्रात १९ लाख ६६ हजार घरं देणार...