एक्स्प्लोर

Latur : लातुरातील बाळू डोंगरे हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर पोलिसांच्या तावडीत, हरिद्वार

Latur Crime : पैशाच्या देवाणघेवाणीच्या वादातून लातूरमध्ये सिक्युरिटी सुपरवायझरची हत्या करण्यात आली होती. त्यातील आरोपी आता पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. 

लातूर: हॉस्पिटलमध्ये सिक्युरिटी सुपरवायजर म्हणून काम करणाऱ्या बाळू डोंगरे हत्या प्रकरणातील आरोपी डॉ. प्रमोद घुगे याला अखेर पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. आरोपी डॉक्टरला हरिद्वारमधून पोलिसांनी अटक केली आहे. आठ दिवसांपूर्वी बाळू डोंगरेची हत्या झाली होती आणि आरोपी डॉक्टर फरार झाला होता. या प्रकरणातील आणखी एक आरोपी अद्याप फरार आहे. 

लातूर शहरातच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये प्रसिद्ध किडनी रोग तज्ञ म्हणून डॉ. प्रमोद घुगे यांचा नावलौकिक आहे. त्यांच्या आयकॉन हॉस्पिटल येथील सिक्युरिटी सुपरवायझर बाळू डोंगरे याची आठ दिवसांपूर्वी हत्या झाली होती. आर्थिक देवाणघेवाणीवरून डॉक्टर आणि बाळू डोंगरे यांच्यामध्ये वाद होता. या वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाला आणि यात बाळू डोंगरे यांच खून झाला.

डॉ. प्रमोद घुगे हे बाळू डोंगरे याला ठरवून दिलेले पैसे देत नव्हते. यावरून बाळू डोंगरे आणि प्रमोद घुगे यांच्यात सातत्याने वाद होते. 11 डिसेंबरच्या मध्यरात्री बाळू डोंगरे हा आयकॉन हॉस्पिटलमध्ये गेला होता. त्या ठिकाणी डॉ. आणि बाळू डोंगरे यांच्यामध्ये प्रचंड वाद झाला. यात डॉ. प्रमोद घुगे आणि अनिकेत मुंढे यांनी बाळू डोंगरे याला मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. 

अपघात झाल्याचा बनाव रचला

गाडीवरून पडून अपघात झाल्याचा बनाव करत डॉक्टरने पोलिस आणि कुटुंबीयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र मृतदेह पाहिल्यानंतर कुटुंबीयांचा आणि पोलिसांचा संशय बळावला. त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. कारण बाळू डोंगरे यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीचे वळ दिसून येत होते. अपघात झाल्यानंतर असल्या पद्धतीचा मार लागत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. बाळू डोंगरे यांचा खून झाला असल्याची खात्री नातेवाईकांनी घटनाक्रम लक्षात घेऊन केली. त्यानंतर डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली. 

याच काळात डॉ. प्रमोद घुगे आणि त्याचा सहकारी अनिकेत मुंडे हे लातूर येथून फरार होण्यात यशस्वी झाले. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी तीन पथके रवाना केली होती. हरिद्वार येथील पोलिसांच्या पथकाला डॉ. घुगे यांना अटक करण्यात यश आलं आहे. यातील दुसरा एक आरोपी अद्याप फरार आहे.

ही बातमी वाचा:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे

बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?

लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं

समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळून खाक
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळून खाक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Satish Bhosale House : 'खोक्या'च्या घरावर घाई, सुरेश धसांना वाटतेय घाई!Special Report Gold Silver Rate : तोळा होणार लाख मोलाचा, सोनं आणि चांदीच्या दराचा नवा उच्चांकSpecial Report Halal Vs Zatka : हलालविरुद्ध झटका, मल्हार सर्टिफिकेटला हिंदू खाटिकांचाच विरोधSpecial Report Aurangjeb Kabar : पून्हा बाबरीची धमकी, औरंगजेबाच्या कबरीवरुन राजकारण तापलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे
छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे
बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?
बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?
लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं
लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळून खाक
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळून खाक
औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड

मोठी बातमी ! 16 महिलांसह 64 नलक्षवाद्यांचे समर्पण; बंदुका खाली ठेऊन शांतेतेचा मार्ग, प्रत्येकी 25 हजार मदत

रायगडच्या वरंधा घाटात बसचा भीषण अपघात; एसटी पलटी झाल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी

फोनवर बोलताना हॅलोऐवजी जय शिवराय म्हणा; राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून सूचना, म्हणाले, प्रांताध्यक्षांचा आदेश

Embed widget