Maharashtra : लाडकी बहीण योजनेबाबत चिंता; राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आढावा अहवाल RBI कडून प्रसिद्ध
राज्यांच्या अर्थव्यवस्थेचा आढावा घेणारा एक अहवाल रिझर्व्ह बँकेकडून नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पातील वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांवर होणारा खर्च आणि इतर अनेक बाबींवर या अहवालात प्रकाश टाकण्यात आला आहे. महत्वाची बाब म्हणजे यात लाडकी बहीणसारख्या कल्याणकारी योजनांबाबत रिझर्व्ह बँकेनं चिंता व्यक्त केली आहे. २०२३-२४ आणि २०२४-२५ या सलग दोन आर्थिक वर्षांमध्ये महाराष्ट्र सर्वाधिक उसनवारी करणारं राज्य ठरलंय. त्याचबरोबर वीज वितरणात होणाऱ्या देशाच्या नुकसानात सहा राज्यांचा ७५ टक्के वाटा आहे . त्या सहा राज्यांमध्येही महाराष्ट्राचा समावेश आहे.
खर्च महाराष्ट्राचा
लाडकी बहीण योजना
लाभार्थी - २ कोटी
खर्च - ३५,००० कोटी
लेक लाडकी योजना
लाभार्थी - ७५ हजार
खर्च - ३९ कोटी
मुलींना मोफत शिक्षण
खर्च - २००० कोटी
नमो शेतकरी महासन्मान निधी
लाभार्थी - ९१ लाख
खर्च - ९०५५ कोटी
मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजना
लाभार्थी - ४४ लाख
खर्च - १४,७६१ कोटी