Top 70 News : सकाळी 7 च्या 70 महत्वाच्या बातम्यांचा आढावा : 05 DEC 2024 : ABP Majha
Top 70 News : सकाळी 7 च्या 70 महत्वाच्या बातम्यांचा आढावा : 05 DEC 2024 : ABP Majha
देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, पंतप्रधान मोदींसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईच्या आझाद मैदानावर आज संध्याकाळी 5.30 वाजता शपथविधी सोहळा.
एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात सामील होणार का याबाबत अद्याप संभ्रम कायम,
फडणवीसांनी दोनदा शिंदेंची घेतलीय भेट
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत काही मंत्र्यांचाही आज शपथविधी व्हावा, शिंदेंची मागणी, शिवसेनेला अपेक्षित खाती आणि संभाव्य मंत्र्यांबाबतही चर्चा, तर वरिष्ठांशी चर्चा करणार, फडणवीसांची माहिती.
फडणवीसांसोबत अजित पवार घेणार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ,
अजित पवारांकडून पत्रकार परिषदेत स्पष्ट
आज फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार, तर बाकीचे मंत्री अधिवेशनाआधी शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती.
रामदास आठवलेंनी घेतली सागर बंगल्यावर फडणवीसांची भेट,
आरपीआयला एक मंत्रिपद मिळावं,आठवलेंची मागणी,
आज शपथविधीनंतर होणार पहिली मंत्रिमंडळाची बैठक,
विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती,
महायुतीकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता..