TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 26 June 2024 : ABP Majha
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 26 June 2024 : ABP Majha
आज लोकसभा अध्यक्षपदासाठी मतदान होणार,सकाळी ११ वाजता मतदान प्रक्रिया सुरू होणार.एनडीएचे उमेदवार आणि भाजप खासदार ओम बिर्ला यांचा सामना काँग्रेसच्या कोडीकुन्नील सुरेश यांच्याशी होणार.
राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते असणार, काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी के.सी.वेणुगोपाल यांची घोषणा,काँग्रेस संसदीय दलाच्या नेत्यांकडून लोकसभेच्या हंगामी अध्यक्षांना पत्र
लोकसभेत सभापती हा सभागृहाचा असावा, कोणत्याही विशिष्ट पक्षाचा नसावा, तसेच उपसभापतीही सभागृहाचेच असावे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं वक्तव्य.
सभापती निवडीबाबत ममता बॅनर्जींच्या भूमिकेवर सस्पेन्स, ममता आपला निर्णय सकाळी 9.30 वाजता काँग्रेसला सांगतील, सूत्रांचा दावा. न बोलता उमेदवार उभे केल्याने ममता नाराज.
चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांबाबत काँग्रेस अॅक्शन मोडवर, हरियाणा काँग्रेसने आज बोलावली बैठक, दिल्लीत संध्याकाळी ५ वाजता विचारमंथन होणार.