(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pooja Khedkar IAS Case : पूजा खेडकरांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? त्यांना अटक होण्याची शक्यता
Pooja Khedkar IAS Case : पूजा खेडकरांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? त्यांना अटक होण्याची शक्यता
वायसीएम रुग्णालयाने IAS पूजा खेडकरांना दिलेलं सात टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र खरे असल्याचा दावा डॉक्टर राजेश वाबळेंनी केलाय. मात्र खेडकरांनी MRI रिपोर्ट फक्त दाखवला पण तो कागदपत्रांसह जोडला नाही. याची कबुली डॉ वाबळेंनी दिलीये. त्याचवेळी तपासण्या झाल्यानंतर सर्व कागदपत्रे दिव्यांग विभागात रुग्णाने जमा करण्याची परंपरा पूर्वीपासून आहे. असं म्हणत वायसीएम रुग्णालयाने हात झटकले आहेत. पूजा खेडकरने MRI रिपोर्ट न देता अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळविल्याचे एबीपी माझाने समोर आणले होते. असं असताना ही ऑर्थोपेडिक आणि फिजिओथेरपी विभागाने चोखपणे आणि निष्पक्षपणे बजवल्याचं चौकशी अहवालात नमूद आहे. त्यामुळं या चौकशीवर ही प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या सूचनेनुसार पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने हे चौकशीचे आदेश दिले होते.