![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Manohar Bhosale | भोंदू मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले यांना आज कोर्टात हजर करणार ABP Majha
बारामती : बाळू मामांचा अवतार असल्याचे सांगत 2 लाख 51 हजारांची फसवणूक केल्या प्रकरणी मनोहर भोसले यांना अटक करण्यात आली आहे. मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले यांना बारामती पोलीस आणि पुणे एलसीबीने अटक केली आहे. मनोहर भोसले यांना सातारा जिल्ह्यातील सालपे गावातील एका फार्महाऊस वरुन अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती तालुका पोलिसांनी मनोहर भोसले याला ताब्यात घेतलं आहे.
मनोहर मामा भोसलेंसह इतर दोघांनी फसवणूक केल्याबद्दल बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मनोहर भोसले यांच्या विरोधात शशिकांत खरात यांनी तक्रार दाखल केली होती. शशिकांत खरात हे बारामती तालुक्यातील गोजुबाबी इथले रहिवासी आहेत. शशिकांत खरात यांच्या वडिलांना थायरॉईड आणि कॅन्सर झाला होता. त्यांच्या वडिलांवर उपाय करण्यासाठी उंदरगावला शशिकांत खरात हे त्यांच्या वडिलांना घेऊन गेले. मनोहर मामा भोसले यांनी स्वतः बाळू मामांचा अवतार असल्याचा बनाव केला. खरात यांच्या वडिलांना झालेल्या कॅन्सरवर उपाय म्हणून बाभळीच्या पाला, साखर आणि भंडारा खाण्यास देऊन त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले.
![Anil Parab Full PC : मुंबईत मराठी माणूस टिकला पाहिजे : अनिल परब : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/24/08e6db31ebc8da6cdb3ca349e29676f21719235123897976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Pune Drugs Video Exclusive : पुण्यातील मॉलमध्ये ड्रग्जचं सेवन, 2 तरुणींचा धक्कादायक व्हिडीओ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/24/494171f051542c417424369402f6991f1719234612237976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Bhandara : गोसीखुर्द जल पर्यटन प्रकल्पाच्या फलकावरुन फडणवीसांचे नावच गायब!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/24/9ae7949fbf97a82bd3395e9f8dc35adf1719234195943976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 24 June 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/24/9ca605853d2abd7132a3bcf32569209d1719233785575976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Raj Thackeray MNS Meeting : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज मुंबई बैठक संपन्न! ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/24/063ee86f1aa3ed59af0f8e4b72ffaa161719233134282976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)