Breaking News : मोठी बातमी! अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
Sukhbir Singh Badal Was Attacked: सुखबीर सिंह बादल यांना गोळ्या घालण्याचा प्रयत्न; सुवर्ण मंदिराबाहेर द्वारपाल म्हणून 'शिक्षा' भोगत असताना जीवे मारण्याचा प्रयत्न
Sukhbir Singh Badal Was Attacked: माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल (Sukhbir Singh Badal) यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे. सुवर्ण मंदिराबाहेर हाणामारी झाली, त्याचवेळी सुखबीर सिंह बादल यांना गोळी मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
सुवर्ण मंदिराबाहेर झालेल्या गोळीबारातून अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांचा जीव थोडक्यात बचावला आहे. बुधवारी पहाटे सुखबीर सिंह बादल यांना गोळ्या घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. हल्लेखोराच्या गोळीबारानं सुवर्ण मंदिराबाहेर खळबळ उडाली. मात्र, तिथे उपस्थित लोकांनी हल्लेखोराला पकडलं. सुखबीर सिंह बादल यांच्यावर हा जीवघेणा हल्ला तेव्हा झाला, जेव्हा ते सुवर्ण मंदिराच्या बाहेर द्वारपाल म्हणून धार्मिक शिक्षा भोगत होते.
#WATCH | Punjab: Visuals from Golden Temple in Amritsar where a bullet was fired at SAD leaders, including party chief Sukhbir Singh Badal. pic.twitter.com/FsKOzmvcxt
— ANI (@ANI) December 4, 2024
अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल द्वारपाल म्हणून सेवा करत होते, त्याचवेळी गोळीबार करण्यात आला. ते सुवर्ण मंदिराच्या दरबार साहिबच्या गेटवर द्वारपाल म्हणून काम करत होते. तेवढ्यात समोरून हल्लेखोर आला आणि त्यांच्यावर गोळीबार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. त्र, सुखबीर सिंह बादलच्या शेजारी उभ्या असलेल्या एका सैनिकानं हल्लेखोराला थांबवलं आणि गोळी झाडली. मात्र, ही गोळी कोणालाही लागली नाही.
त्यानंतर सुरक्षारक्षकांनी आरोपीला पकडलं. ज्या ठिकाणी गोळीबार झाला, त्याचवेळी तिथे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल उपस्थित होते. या हल्ल्यात जीवीतहानी झालेली नाही. हल्लेखोर खलिस्तानी कारवायांमध्ये सामील असल्याचं सांगण्यात येत आहे. नारायण सिंह चौडा असं आरोपीचं नाव आहे. आरोपींवर यापूर्वीही अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे.
पाहा व्हिडीओ : पंजाब हादरलं, सुवर्ण मंदिराबाहेर माजी उपमुख्यमंत्र्यांवर गोळीबार