(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shrikant Shinde Big News : एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार?
Shrikant Shinde Big News : एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार?
राष्ट्रवादी कडून 8 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदांची मागणी होते आहे. शिवसेना शिंदेकडून कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदं मिळून 12 मंत्रीपदांची मागणी केली आहे तर भाजपकडून 23 मंत्रीपदांची मागणी आहे दरम्यान सूत्रांची माहिती अशी आहे की राष्ट्रवादी आणि शिवसेनेला केंद्रात 1-1 कॅबिनेट मंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे - राष्ट्रवादीकडून सुनिल तटकरे किंवा प्रफुल पटेल यांच्यापैकी एकाची कॅबिनेटमध्ये वर्णी लागण्याची शक्यता आहे.. तर शिवसेनेकडून मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेटमध्ये स्थान मिळण्ाची शक्यता आहे.
हे ही वाचा..
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीला (Mahayuti) मोठं यश मिळालं तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला. सायंकाळी साडेपाच वाजेनंतर जे मतदान झालं आहे, त्याचे फोटो दाखवा. हे मतदान कुठल्या सेंटरवर झालं? साडेसात टक्क्यांनी मतदान कसं वाढलं? या सर्वाचं उत्तर निवडणूक आयोगाने (Election Commission) दिलं पाहिजे. जनतेची मतं चोरण्याचं आणि डाका टाकण्याचं काम निवडणूक आयोग करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. आता यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी नाना पटोले यांना प्रत्युत्तर दिले आहे.