ABP Majha Headlines : 12.00 PM : 29 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
पुणे अपघात प्रकरणात आरोपी कितीही मोठा असला तरी कारवाई करा, पुणे पोलीस आयुक्तांना मुख्यमंत्र्यांची कडक शब्दात समज
पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला जामीन देणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या सदस्याची चौकशी होणार, समिती स्थापन
पुणे अपघात प्रकरणात आमदार मुलाचाही समावेश, नाना पटोलेंचा गंभीर आरोप, अपघातग्रस्त गाडीतून उतरलेले दोघे कोण, पटोलेंचा सवाल
अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी विशाल अगरवालचे डॉ. तावरेला तब्बल १४ फोन कॉल, रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात नवी माहिती तर पोलिसांकडून डॉ.तावरे आणि डॉ. हळनोर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव
पालघर मालगाडी अपघाताचा फटका उपनगरीय सेवेला, डहाणू ते विरार लोकलसेवा पूर्णपणे ठप्प, कामावर जाणाऱ्यांचे कमालीचे हाल, दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरु
१५ जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार, हवामान विभागाचा अंदाज, यावर्षी सरासरीपेक्षा १०६ टक्क्यांनी अधिक पावसाची शक्यता
काँग्रेस नेते करणार दुष्काळी भागाची पाहणी, काँग्रेसकडून विभागनिहाय दुष्काळ पाहणी समिती स्थापन, सरकारने केलेल्या उपाययोजनांवर काँग्रेस समितीची नजर
आमदार जितेंद्र आव्हाड आज करणार मनुस्मृतीची होळी, महाडच्या दिशेने रवाना, मनुस्मृतीतले श्लोक अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यास विरोध, महाड पोलिसांची आव्हाडांना नोटीस
जरंडेश्वर कारखान्याची पुणे एसीबीकडून चौकशी, कोरेगावमधला भूखंड आणि डिस्टलरी प्रकल्पाबाबत नोटीस, तर चौकशी १९९० ते २०१० या काळातली, आपला संबंध नाही, अजित पवारांचं स्पष्टीकरण
सांगली जिल्ह्यात तासगाव - मणेराजुरी मार्गावर अल्टो कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
खरीप हंगामच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून 17 भरारी पथकांची नियुक्ती, खतं, बियाणांचा पुरवठा, भेसळ, भ्रष्टाचारावर ठेवणार नियंत्रण
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आर्थिक घोटाळाप्रकरणी प्रशासक नेमा, राजू शेट्टींची मागणी
मेट्रो ३ चा आरे ते बीकेसी टप्पा दृष्टीक्षेपात, आठवड्याभरात MMRC च्या सर्व चाचण्या होणार पूर्ण
LIC कडून केंद्राच्या गंगाजळीत घसघशीत पुरवठा, केंद्र सरकारला मिळणार साडेतीन हजार कोटींचा लाभांश
निवडणूक प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान मोदी कन्याकुमारीला जाणार, स्वामी विवेकानंद स्मारकात दोन दिवसांची ध्यानधारणा
मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस पुन्हा गोत्यात, १९६२ च्या भारत चीन युद्धात चीनने कथितरित्या भारताचा भाग बळकावल्याचं वक्तव्य, काँग्रेसची सारवासारव
१९९९ मध्ये पाकिस्तानकडून लाहोर कराराचं उल्लंघन करून चूक केल्याची नवाज शरीफ यांची कबुली, कारगिल युद्धाच्या रूपात कराराचं उल्लंघन झाल्याची कबुली
![ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8 AM 18 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/1b9ea2d2b6a261d9e0a139c02295561a1739847692266976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Suresh Dhas on Manoj Jarange : जरांगे पाटील आमचे दैवत;मी त्यांच्यावर काही बोलणार नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/a10751eb1be5374717d8b19439c409681739847292191976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7 AM 18 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/f270132982449c525d533275454ec89e1739843525024976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/f50b4dd4432551bcdd60230fe713f9e21739814514058977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/8c8bb3f9f6f35c2a953e16f5c2962c481739802110139977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)