Jaipur Kidnapper Emotional : 14 महिने सांभाळले, पोलिसांकडे सोपवले, किडनॅपर अन् चिमुकला हमसून रडले
Jaipur : राजस्थानमधून एक आश्चर्यकारक प्रकार समोर आलाय. एका चिमुकल्याचे 14 महिन्यांपूर्वी अपहरण करण्यात आले होते. दरम्यान, 14 महिन्यांनंतर चिमुकला सापडला. अपहरणकर्त्यालाही पोलिसांनी पकडलं. त्यानंतर चिमुकल्याला अपहरणकर्त्यांकडून सोडवून पालकांकडे सोपवताना आश्चर्यकारक प्रकार घडलाय. चिमुकला अपहरणकर्त्याला गच्च मिठ्ठी मारुण रडायला लागला. मुलाला रडताना पाहून आरोपीलाही भावना आवरता आल्या नाहीत. तोही रडू लागला. या आश्चर्यकारक प्रकाराचा व्हिडीओ समोर आलाय.
अधिकच्या माहितीनुसार, 14 महिन्यांपूर्वी जयपूरमध्ये एका मुलाचे अपहरण झाले होते. तब्बल 14 महिन्यांनंतर पोलिसांनी मुलासह आरोपीला पकडले. मुलाला ताब्यात देण्याची वेळ आली तेव्हा अपहरणकर्त्याला सोडायला मुल तयार नव्हते. अशा परिस्थितीत पोलिसांनी आरोपीला चिकटलेल्या मुलाला बळजबरीने सोडवून कुटुंबियांच्या ताब्यात दिले. मुलाला रडताना पाहून अपहरणकर्ताही रडू लागला.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
गेल्या वर्षी 14 जून रोजी 11 महिन्यांच्या पृथ्वी उर्फ कुक्कूचे जयपूरच्या सांगानेर येथून अपहरण करण्यात आले होते. तब्बल 14 महिन्यांनंतर पोलिसांनी अपहरणकर्त्याला अटक करून त्याच्या ताब्यातून मुलाला सोडवले. यावेळी मुलाला त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्याची वेळ आली, तेव्हा तो जोरजोरात रडू लागला. हे दृश्य पाहून पोलिसांचेही डोळे पाणावले.