'लग्नाला सात वर्ष झाली, आम्हाला मुलं नाही, माझ्या नवऱ्यापासून तू मुलाला जन्म दे, बदल्यात तुला..', भलतीच अट मान्य न केल्यानं बायको अन् नवऱ्याने घरच्या मोलकरणीला...
मोलकरीण जोडप्याकडे काम करत होती, तेव्हा एका रात्री दारू पिऊन सोनिया तिच्याकडे आली. तिने सांगितले की, तिचे लग्न होऊन सात वर्षे झाली असून अद्याप तिला मूल झालेले नाही.

A maid was lured with land in the hope of having a child : मुलं होण्यासाठी विवाहित जोडप्याचा होणारा जीवाचा आटापिटा सर्वज्ञात असला, तरी एक भलताच प्रकार समोर आला आहे. बाॅलिवूडमधील चोरी चोरी चुपके चुपके चित्रपटात श्रीमंत भारतीय कुटुंबातून आलेले राज म्हणजेच आणि प्रिया एका लग्नात भेटतात आणि प्रेमात पडतात. लग्नानंतर लवकरच प्रिया गरोदर राहते. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात प्रियाला गर्भपात होतो आणि ती कायमची आई होण्यापासून दुरावते. यानंतर राज मधुबाला "मधू"ला भेटतो, एक वेश्या असते, जी पैशाच्या बदल्यात तयार होते. आणि तिघेजण गुप्तपणे त्यांची योजना पूर्ण करण्यासाठी स्वित्झर्लंडला जातात. असा चित्रपटातील प्रसंग असला, तरी असाच एक धक्कादायक प्रकार लग्नाला सात वर्ष झाल्यानंतर मुलं होतं नसल्याने केलेल्या कारनाम्यातून समोर आला आहे.
जोडप्याने मूल होण्याच्या आशेने मोलकरणीला जमिनीचे आमिष दाखवले
उत्तर प्रदेशातील गोरखपूरच्या शाहपूर येथे राहणाऱ्या जोडप्याने मूल होण्याच्या आशेने मोलकरणीला जमिनीचे आमिष दाखवले. नकार दिल्याने पत्नीने मोलकरणीच्या गळ्यावर चाकू धरला आणि पतीने तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. कुशीनगर पीडितेच्या तक्रारीवरून शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, त्यानंतर पती-पत्नी फरार झाले आहेत. शाहपूर बसंत बिहार कॉलनीतील ब्रिजपाल सिंह आणि त्यांची पत्नी सोनिया सिंह यांच्या अटकेसाठी एसएसपीने प्रत्येकी 10,000 रुपयांचे बक्षीस ठेवले आहे. आरोपी ब्रिजपाल सिंह याचे मूळ निवासस्थान मथुरा जिल्ह्यातील कोसीकला नांद गावात आहे. कुशीनगर येथील पीडितेने 11 जून 2024 रोजी शाहपूर पोलिस ठाण्यात ब्रिजपाल सिंह आणि त्यांची पत्नी सोनिया यांच्यावर बलात्कार आणि मारहाणीचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता.
पीडितेने सांगितले की, ब्रिजपाल सिंहने कोणाकडून तरी नंबर घेऊन फोन केला आणि तो सुपरवायझर असल्याचे सांगितले. घरचा स्वयंपाक हवा. घरी जेवण बनवण्याच्या बदल्यात महिन्याला 10 हजार रुपये देण्याचे सांगितले. फेब्रुवारी 2024 मध्ये ती शाहपूर येथील ब्रिजपालच्या भाड्याच्या घरात गेली आणि तिथे काम करू लागली.
अजमेरमध्ये जमीन आणि फ्लॅट देण्याचे आमिष दाखवले
पीडितेने सांगितले की, ती काही दिवसांपासून काम करत होती, तेव्हा एका रात्री दारू पिऊन सोनिया तिच्याकडे आली. तिने सांगितले की, तिचे लग्न होऊन सात वर्षे झाली असून अद्याप तिला मूल झालेले नाही. जर तू माझ्या नवऱ्याबरोबर मुलाला जन्म दिलास तर त्या बदल्यात अजमेरमध्ये तुझ्या नावावर जमीन आणि फ्लॅट देईन. नकार दिल्यावर सोनियाने आमच्या गळ्यावर चाकू ठेवला, त्यानंतर ब्रिजपालने शिवीगाळ करत बलात्कार केला. याचा व्हिडीओही सोनियाने आपल्या मोबाईलमध्ये बनवला आहे. त्यानंतर तो अनेक दिवस तिच्यावर बलात्कार करत होता. कशीतरी त्यांच्या तावडीतून सुटका करून तिने पोलीस ठाण्यात माहिती दिली. पती-पत्नी शाहपूर पोलिस ठाण्यात वॉण्टेड असून, त्यांच्या अटकेसाठी प्रत्येकी 10,000 रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिस अधीक्षक अभिनव त्यागी यांनी सांगितलं आहे.























