Devendra Fadnavis Speech : शरद पवारांचं कौतुक, हिटमॅनची तारीफ Wankhede वर फडणवीसांची जोरदार 'बॅटींग'
Devendra Fadnavis Speech : शरद पवारांचं कौतुक, हिटमॅनची तारीफ Wankhede वर फडणवीसांची जोरदार 'बॅटींग'
बईतील वानखेडे मैदानावर एमसीएच्यावतीने (MCA) आयोजित कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांचं तोंड भरुन कौतुक केले. फडणवीसांनी आपल्या भाषणात शरद पवार (Sharad Pawar), रोहित शर्मा यांचे क्रिकेटमधील योगदान सांगत स्तुतीसुमने उधळली. तर, दिवंगत अमोल काळे यांच्या आठवणी जागवत त्यांनी देखील अल्पवधीतच एमसीए आणि क्रिकेटसाठी लक्षात राहिल असं काम केलंय. भारतीय क्रिकेट विकसित करणाऱ्या प्रशासकांमध्ये पवार साहेबांचं नाव अग्रणी असेल. एमसीए, बीसीसीआय आणि आयसीसीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं काम हे मोठं आहे, असेही फडणवीसांनी म्हटलं.
मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये एमसीएच्यावतीने आज भव्य सोहळा पार पडला. टीम इंडियाचा हिटमॅन, मुंबईचा अभिमान रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नावाने स्टँडचं नामकरण करण्यात आले. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा पहिल्यांदाच अशा मोठ्या सोहळ्यात सहभागी झाला. या खास कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे सुद्धा उपस्थिती होते. याचवेळी भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर आणि शरद पवार यांच्या नावाने देखील स्टँडचं नामकरण करण्यात आलं आहे. तसेच एमसीएचे माजी अध्यक्ष अमोल काळे यांच्या नावाने एमसीए ऑफिस लाउंजचेही उद्घाटन झाले. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार बॅटींग केली. तसेच, क्रिकेट विश्वातील योगदानाबद्दल शरद पवारांवर जाहीरपणे स्तुतीसुमने उधळली.






















