Pakistan Operation Sindoor Special Report : भीती ऑपरेशन सिंदूरची, भाषा बदलली पाकची, पाकिस्तानची झोप उडाली?
Pakistan Operation Sindoor Special Report : भीती ऑपरेशन सिंदूरची, भाषा बदलली पाकची, पाकिस्तानची झोप उडाली?
Israel vs Iran War: इराण आणि इस्त्रायलमध्ये भयंकर युद्ध सुरू झाले असून परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. शनिवारी (28 फेब्रुवारी 2026) इस्त्रायलने अमेरिकेसोबत संयुक्त कारवाई करत इराणवर हल्ला केला. त्यानंतर तेहरानने त्वरित प्रत्युत्तर दिले आणि पश्चिम आशियामधील अमेरिकन एअरबेसवर क्षेपणास्त्र हल्ले केले. तर अमेरिका आणि इस्त्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी ठार झाले आहेत. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केलाय.
संजय राऊत म्हणाले की, अमेरिका, इराण, इस्रायलच्या युद्धात खामोनी आणि त्यांचे कुटुंब ठार झाल्याची बातमी आहे. मोदी दोन दिवसांपूर्वीच इस्रायलहून परतले आणि दुसऱ्याच दिवशी इराण-इस्रायलमध्ये युद्ध पेटले. हा योगायोग असू शकत नाही. मोदींचे ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्याशी जवळचे संबंध आहेत. इराण भारताचा मित्र होता. इस्रायल देखील आहे. काश्मीर प्रश्नावर इराण भारताच्या बाजूने उभा राहिला. अत्यंत स्वस्त दरात इराण तेल देत होता. या युद्धात भारताने एक भूमिका घेणे आवश्यक आहे. मोदी ट्रम्प आणि नेतन्याहू यांचे मित्र आहेत. त्यांनी युद्ध थांबवायला हवं होते, असा हल्लबोल त्यांनी केलाय.





















