एक्स्प्लोर
Advertisement
नागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा
नागपूर : क्राईम सिटी अशी ओळख बनत असलेल्या नागपुरात खंडणीखोरांची दहशत माजली आहे. गुंड हातात तलवारी घेऊन ग्राहकांनी भरलेल्या हॉटेलमध्ये धुमाकूळ घालून दहशत निर्माण करत आहेत. नागपुरातील महाअन्नपूर्णा हॉटेलमधील हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत महाअन्नपूर्णा हॉटेलमध्ये 17 एप्रिलच्या रात्री भरपूर गर्दी होती. लोक स्नॅक्सचा आनंद लूटत असताना रात्री 10 वाजताच्या सुमारास सात ते आठ गुंडांनी हॉटेलसमोर येऊन शिवीगाळ आणि धमकावणं सुरु केलं. ग्राहकांना काही कळायच्या आधीच गुंडांनी हॉटेलच्या काऊंटरवर बसलेल्या मॅनेजरच्या दिशेने सशस्त्र हल्ला केला.
गुंडांच्या हातात तलवारी होत्या, या हल्ल्यामुळे हॉटेलमध्ये पळापळ झाली. महिलांनी कसाबसा लहान मुलं आणि स्वतःचा जीव वाचवला. काऊंटरवर बसलेल्या मॅनेजरने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हल्लेखोर गुंडाच्या दिशेने कढई फेकून मारली. त्यानंतर गुंड तिथून पळून गेले.
हल्ल्याची ही दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून हॉटेलचा एक कर्मचारी या हल्ल्यात जखमी झाला आहे. हुडकेश्वर पोलिसांनी या प्रकरणात बेकायदेशीररित्या मंडळी जमवून हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
हत्या, मारामारी आणि खंडणी असे गुन्हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या काही दिवसांपासून नागपुरातील गुन्हेगारी हा चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे नागपूरकर दहशतीखाली जीवन जगत आहेत.

महाराष्ट्र
दुपारी २ च्या हेडलाईन्स- एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 2 PM Maharshtra politics 06 नोव्हेंबर 2024
Sadabhau Khot on Sharad Pawar:महाराष्ट्राचा चेहरा तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? पवारांना सवाल
Chitra Wagh Solapur : कुणी घंटी वाजवली ते शोधा; Satej Patil यांच्यावर हल्लाबोल
Raj Thackeray Latur : इतकी वर्ष त्याच लोकांना निवडून देण्याऐवजी वेगळा प्रयोग करून बघा
Ajit Pawar On Ramraje Nimbalkar : रामराजे प्रचारात दिसत का नाहीत? नोटीस पाठवतो, अजित पवार संतापले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
सिंधुदुर्ग
वर्धा
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement