एक्स्प्लोर

भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले

आष्टी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेदवार भीमराव धोंडे यांनी प्रचारसभेत भाषण करताना स्वतःचे शिट्टी चिन्ह विसरून तुतारी वाजवण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले, चूक लक्षात येताच सारवासारक केली

बीड : जिल्ह्यातील राजकारणाची तऱ्हाच वेगळी आहे. त्यामुळेच, बीड (Beed) जिल्ह्याच्या राजकारणाकडे राज्याचे लक्ष लागलेले असते. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंपासून ते आत्तापर्यंतच्या युवा नेत्यांपर्यंत येथील राजकीय रंगत कायम चर्चेत असते. लोकसभा निवडणुकीतही यंदा येथील मतदारसंघात अनेकांच्या भुवया उंचावणारा निकाल पाहायला मिळाला. मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीचा व आंदोलनाचा फटका भाजप नेत्या पंकजा मुंडेंना बसल्याने येथे बजरंग सोनवणे यांचा विजय झाला. त्यामुळे, विधानसभा निवडणुकीत येथील मतदारसंघात नेमकं काय होणार, कोणाच्या पारड्यात बीडची जनता कौल देणार हे पाहावे लागेल. दरम्यान, बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा (Ashti) मतदारसंघात भाजप नेते आणि माजी आमदार भीमराव धोंडे (Bhimrao dhonde) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, गेली अनेक वर्षे भाजपात काम केल्याने निवडणूक प्रचारसभेत त्यांना अपक्ष म्हणून स्वत:चे असलेले चिन्हच लक्षात आले नाही. त्यामुळे, कार्यकर्त्यांना चक्क तुतारी वाजवण्याचे आवाहन त्यांनी केलंय.  

बीडच्या आष्टी विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे बंडखोर माजी आमदार भीमराव धोंडे अपक्ष विधानसभा निवडणूक लढवीत आहेत. अशातच प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत त्यांनी आपले चिन्ह विसरून कार्यकर्त्यांना तुतारी वाजवण्याचे आवाहन केले. मात्र, ही बाब व्यासपीठावर बसलेल्या कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर लागलीच त्यांनी सरवासावर केली. भीमराव धोंडे हे भाजपाचे माजी आमदार आहेत. मात्र, यावेळी भाजपाने त्यांना उमेदवारी डावलून सुरेश धस यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केलीय. अशातच त्यांच्याकडून प्रचाराची सुरुवात देखील झाली आहे, आज आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत ते आपलं निवडणुकीतील चिन्ह विसरले आणि त्यांनी कार्यकर्त्यांना शरद पवार गटाचे चिन्ह असलेले तुतारी वाजवण्याचे आवाहन केले. परंतु, ही बाब कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी सरवासारव करत आपल्या चिन्हाचा उल्लेख केला. परंतु सध्या मतदारसंघात त्यांचा हा व्हिडिओ आणि याची चर्चा चांगलीच जोर धरू लागलीय. 

दरम्यान, भीमराव धोंडे यांना शिट्टी हे चिन्ह मिळाले असून आष्टी मतदारसंघात त्यांना महायुतीचे उमेदवार सुरेश धस यांचे आवाहन आहे. तर, या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मेहबूब शेख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे येथील मतदासंघात तिरंगी लढत होत आहे. 

हेही वाचा

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला 3000; राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे तर 191 हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल; पोलिसांकडून आकडेवारी समोर
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे तर 191 हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल; पोलिसांकडून आकडेवारी समोर
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन
Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्या : 6 PM : 09 Jan 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 09 Jan 2025 : ABP MajhaFatima Shaikh:फातिमा शेख एक कल्पोकल्पित पात्र,दिलीप मंडल यांच्या वक्तव्यावर मिलिंद आव्हाड म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे तर 191 हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल; पोलिसांकडून आकडेवारी समोर
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे तर 191 हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल; पोलिसांकडून आकडेवारी समोर
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन
Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन
Sharad Pawar : मराठा सोडून सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा, वेळ देऊ शकेल अशा तरुण चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपदी संधी द्या; थेट शरद पवारांसमोर मागणी!
मराठा सोडून सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा, वेळ देऊ शकेल अशा तरुण चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपदी संधी द्या; थेट शरद पवारांसमोर मागणी!
Video: वाल्मिक कराडची बाजू का घेता? परभणीत लक्ष्मण हाकेंचा माईक हिसकावला, भाषण थांबवलं; व्हिडिओ समोर
Video: वाल्मिक कराडची बाजू का घेता? परभणीत लक्ष्मण हाकेंचा माईक हिसकावला, भाषण थांबवलं; व्हिडिओ समोर
ZP School : जीर्ण इमारती, काटेरी कुंपणाची तटबंदी, जिल्हा परिषदेच्या शाळा मोजतायत शेवटच्या घटका, शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यातील भीषण वास्तव समोर
जीर्ण इमारती, काटेरी कुंपणाची तटबंदी, जिल्हा परिषदेच्या शाळा मोजतायत शेवटच्या घटका, शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यातील भीषण वास्तव समोर
मोठी बातमी: वाल्मिक कराडच्या डोळ्याला संसर्ग; जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून तपासणी, झोप पूर्ण होत नसल्याने...
मोठी बातमी: वाल्मिक कराडच्या डोळ्याला संसर्ग; जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून तपासणी, झोप पूर्ण होत नसल्याने...
Embed widget