गृह कर्ज ईएमआय कॅल्क्युलेट
Monthly Home Loan EMI
₹
Principal Amount
₹
Interest Amount
₹
Total Amount Payable
₹
इतर कॅल्क्युलेटर्स
FAQ
गृह कर्ज म्हणजे काय
राहण्यासाठी घर विकत घेणं किंवा राहण्यासाठी नव्या घराचं बाधकाम यासाठी बँकाकडून घेतलेली कर्जाऊ रक्कम म्हणजे गृहकर्ज. बँकाशिवाय गृहकर्ज देणाऱ्या अनेक हौसिंग लोन संस्था आहेत.
गृहकर्ज ही प्रामुख्याने मोठ्या रकमेची असल्याने त्यासाठी परतफेडीचा कालावधी,कर्जाची रक्कम, व्याजदर आणि आपली परतफेडीची क्षमता या बाबी प्रामुख्याने पाहिल्या जातात.
गृह कर्जाचा ईएमआयआय (मासिक परतफेड हफ्ता) म्हणजे काय
कर्ज म्हणून घेतलेल्या रकमेची निश्चित व्याजासह पूर्ण परतफेड होईपर्यंत दरमहा समान हफ्त्यामध्ये वसूल केली जाणारी रक्कम म्हणजे ईएमआय. दरमहा आकारल्या जाणाऱ्या ईएमआयमध्ये व्याज आणि मुद्दल रक्कम यांचा समावेश असतो. ईएमआयचा म्हणजेच मासिक परतफेडीचा विचार केल्याशिवाय कर्जाची रक्कम आणि परतफेडीची मुदत निश्चित होत नाही. सर्वसाधारणपणे गृहकर्ज हे मोठ्या रकमेची तसंच संरक्षित कर्जाच्या प्रकारात येतात. म्हणजे आपण कर्जाच्या रकमेतून घेत असलेलं घर बँकेकडे कर्जाच्या परतफेडीपर्यंत गहाण ठेवलं जातं. तसंच गृहकर्जाला किंवा त्यातून घेतल्या जाणाऱ्या घराला विम्याचं संरक्षण असतं.
गृहकर्ज ईएमआय कॅल्क्युलेटर म्हणजे काय?
गृह कर्ज हे प्रमुख्याने नव्या किंवा जुन्या घराच्या खरेदीसाठी, खुल्या प्लॉटवर घर बांधण्यासाठी तसंच जागा घेऊन नवीन घर बांधण्यासाठी केला जातो. तुमची कर्ज पत क्षमता (क्रेडिट स्कोअर) तसंच दरमहा आणि वार्षिक उत्पन्न, भविष्यातील वाढणारं उत्पन्न तसंच खरंच यावरुन तुमची कर्ज परतफेडीची क्षमता निश्चित करुन बँका गृहकर्जाची रक्कम ठरवतात. गृहकर्जाची रक्कम निश्चित करताना खरेदी केलेल्या घराची सध्याची तसंच भविष्यातील वाढणारी किंमतही विचारात घेतात, कारण गृहकर्जातून खरेदी केलं जाणारं घर बँकेकडे गहाण असतं.
गृह कर्ज ईएमआय कॅल्क्युलेटर कसं मदत करु शकतं
आपण घेत असलेल्या गृहकर्जाचा मासिक हफ्ता किती असेल याची आधीच कल्पना असेल तर आपल्याला आर्थिक नियोजन करणं सोपं जातं. आपल्या दरमहा मिळकतीतून किती रक्कम कर्ज परतफेडीसाठी बाजूला काढून ठेवायची आहे, याची आधीच कल्पना येते. यामुळे तुम्ही कर्ज आणि त्यावरील व्याज तसंच कर्जाची शिल्लक राहिलेली रक्कम याचाही आढावा घेऊ शकता. कर्जाच्या ईएमआयची आगावू माहिती असणं चांगल्या आर्थिक शिस्तीचं लक्षण आहे.
कर्ज ईएमआय कॅल्क्युलेटरचे फायदे
- आपली कर्ज घेण्याची क्षमता समजते
- किती मुदतीसाठी किती कर्ज घेऊ शकतो, याचं नियोजन करता येतं
- कर्जाच्या परतफेडीचं निश्चित नियोजन करता येतं
- गरजेनुसार मुदतपूर्व कर्ज परतफेड कधी करायची ते ठरवू शकतो
गृह कर्जाचे फायदे
गृह कर्जाचे अनेक फायदे आहेत, त्यापैकी काही
- सध्याच्या आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या घरांच्या किंमतीमुळे गृहकर्जाशिवाय घराचं स्वप्न पाहताही येत नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे घर खरेदीचा विचार करण्यापूर्वी आपली कर्जक्षमता किती याचा विचार करावा लागतो. त्यामुळे गृहकर्जाशिवाय घर प्रत्यक्षात येत नाही
- स्वतःची कितीही बचत असली तरी घर खरेदीसाठी अनेकदा गृहकर्ज अनिवार्य ठरतं.
- गृहकर्जाच्या व्याजातून प्राप्तिकरातून सवलत मिळते.
- गृहकर्जे दीर्घमुदतीची असल्यामुळे मोठ्या रकमेचं कर्ज तुलनेने कमी ईएमआयमध्ये मिळू शकतं.
टॉप न्यूज़
Thane lockdown in Hotspot | ठाणे शहरातील 16 Hotspot क्षेत्रात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन
Nashik Lockdown Update | पुढील आदेशापर्यंत नाशिक शहरातील शाळा, कॉलेज बंद
Special Report | काँगो देशातला डोंगर म्हणजे सोन्याची खाण; व्हिडीओ व्हायरल
CoronaVirus | ठाण्यात पुन्हा हॉटस्पॉट मध्ये लॉकडाऊन! नागरिकांनी नियम पाळण्याचे आवाहन
उज्जैनच्या शिप्रा नदीत सलग विस्फोट; नदी जवळच्या परिसरात भीतीचं वातावरण
IPL 2021 | विराट कोहलीच्या नेतृत्त्वात RCB विजयी होणार? पाहा सीझनचं संपूर्ण शेड्यूल
JEE Main 2021 Result Released: जेईईचा फेब्रुवारी सेशनचा निकाल जाहीर, असा पहा निकाल
Breaking News LIVE : टेस्टिंगला सहकार्य करा, अन्यथा कठोर पाऊलं उचलावी लागतील; कल्याण डोंबिवली मनपा आयुक्तांचा इशारा
Maharashtra Corona Update | राज्यात आज 8744 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 9068 जण कोरोनामुक्त
Maratha Reservation | आरक्षण राज्यांच्या अधिकारापलीकडचं... Special Report