Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासनतरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराचे अजब आश्वासन आमदार झालो तर सर्व तरुणांचे लग्न लावून देईल - देशमुख सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचा फिव्हर आहे. सर्वच पक्षाच्या उमेदवाराकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी आश्वासन दिले जात आहेत. अशातच बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी मात्र तरुण मतदारांना आगळे वेगळे आश्वासन दिले आहे. मी आमदार झालो... तर सगळ्या मुलांचे लग्न लावून देईल... सध्या या विधानाची चांगलीच चर्चा होऊ लागलीय. परळी विधानसभा मतदारसंघात राजेसाहेब देशमुख यांनी खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत प्रचाराला सुरुवात केली. यादरम्यान आयोजित जाहीर सभेत देशमुख यांनी तरुणांना आकर्षित करण्यासाठी हे विधान केलंय. सध्या या विधानाची जिल्हाभरात चांगलीच चर्चा होऊ लागली आहे.बाईट: राजेसाहेब देशमुख - राष्ट्रवादी शरद पवार गट उमेदवार