Suman Vanga : रात्रीच्या अंधारात 'ते' एकटे चालतच निघून गेलेमहायुतीमध्ये पालघरच्या जागेवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून राजेंद्र गावित यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पालघरच्या जागेवर श्रीनिवास वनगा येथून उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर डिप्रेशनमध्ये गेल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बंडामध्ये सहभागी असलेल्या 39 आमदारांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, यामध्ये पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा हे एकमेव उमेदवारी न मिळालेले आमदार आहेत. विधानसभेला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर न झाल्यानंतर दु:खी झाल्याची माहिती त्यांची पत्नी सुमन वनगा यांनी दिली.