Eknath Shinde Misali : ठाण्याच्या गोखले उपहारगृहात एकनाथ शिंदेंचा मिसळीवर ताव राज्यातील महत्वाच्या लढतींपैकी एक असलेल्या मुंबईतील (Mumbai) माहीम विधानसभा मतदारसंघात नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आता 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्यामुळे, येथील शिवसेना महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर (Sada sarvankar) आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील का, त्यांच्यावर बड्या नेत्यांचा दबाव आहे, तो दबाव स्वीकारून ते विधानसभेच्या रिंगणातून बाहेर पडतील का, हे चित्र लवकरच स्पष्ट होईल. मात्र, महायुतीकडून सदा सरवणकर यांना विधानपरिषदेची ऑफर देण्यात आल्याची माहिती आहे. तसेच, अद्यापही त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न वरिष्ठ नेत्यांकडून होत असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे, सदा सरवणकर राजी होऊन विधानपरिषद स्वीकारतील का, हा प्रश्न आहे, त्याचे उत्तर पुढील 4 दिवसांत स्पष्ट होईल.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी मनसेकडून येथील मतदारसंघात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून आपण ही जागा लढवणार असल्याचं त्यांनी म्हटलं. मात्र, मनसेनं लोकसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा दिल्याने भाजपकडून अमित ठाकरेंना विधानसभेला पाठिंबा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न देखील झाला. तसेच, महायुती म्हणून अमित ठाकरेंच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहनही करण्यात आले. मात्र, अद्याप त्यांनी वरिष्ठ नेत्यांची ऑफर स्वीकारली नाही.