Zero Hour : महायुतीच्या आधीच अजित दादांच्या राष्ट्रवादीचा स्वतंत्र जाहीरनामा
Zero Hour : महायुतीच्या आधीच अजित दादांच्या राष्ट्रवादीचा स्वतंत्र जाहीरनामा
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान जसजसं जवळ येत चाललंय, तसतसे पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध होऊ लागलेत. सत्ताधारी महायुतीमध्ये सर्वात आधी जाहीरनामा प्रकाशित करणारा पक्ष हा अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ठरला आहे. बारामतीमध्ये आज दादांनी आपल्या आश्वासनांचं छापील स्वरुप प्रसिद्ध केलं. त्यामध्ये शिक्षणाच्या सोयी, दर्जेदार रस्ते, शेतीचा विकास आणि सामाजिक विकास हे ठळक मुद्दे मांडले आहेत. तसंच मतदारसंघनिहाय जाहीरनामा फोनवरून जाणून घेण्यासाठी एक हेल्पलाईन नंबरही जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान, जाहीरमान्याच्या प्रकाशनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी महाविकास आघाडीनं आश्वासन दिलेल्या योजनांवर परखड टीका केली. मी अर्थमंत्री म्हणून काम केलंय, त्या नात्यानं मविआच्या योजना प्रत्यक्षात आणणं शक्य नाही, अशी टीका अजित पवारांनी केली
.