खाजगी कर्ज ईएमआय कॅल्क्युलेट
Monthly Personal Loan EMI
₹
Principal Amount
₹
Interest Amount
₹
Total Amount Payable
₹
इतर कॅल्क्युलेटर्स
FAQ
व्यक्तिगत कर्ज म्हणजे काय
व्यक्तिगत कर्ज किंवा पर्सनल लोन म्हणजे तुमच्या वेगवेगळ्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी बँकांकडून दिलं जाणारं असंरक्षित कर्ज. व्यक्तिगत कर्ज देताना बँका तुमची व्यक्तीगत कर्ज परतफेडीची क्षमता, तुमचं एकूण मासिक तसंच वार्षिक उत्पन्न, तुमचे दरमहा खर्च याचा विचार करतात. सर्व प्रकारच्या व्यक्तीगत गरजांसाठी केल्या जाणाऱ्या खर्चासाठी व्यक्तीगत कर्ज काढता येतं. याला काही बँका ग्राहक कर्ज म्हणजेच कंझुमर लोन किंवा बहुउद्देशीय कर्ज असंही म्हणतात. या प्रकारच्या कर्जातून व्याजावर घेतली जाणारी रक्कम कशासाठी खर्च केली जात आहे, यावर बँकेची बंधने नसतात.
व्यक्तिगत कर्जाचा ईएमआयआय (मासिक परतफेड हफ्ता) म्हणजे काय
कर्ज म्हणून घेतलेल्या रकमेची निश्चित व्याजासह पूर्ण परतफेड होईपर्यंत दरमहा समान हफ्त्यामध्ये वसूल केली जाणारी रक्कम म्हणजे ईएमआय. दरमहा आकारल्या जाणाऱ्या ईएमआयमध्ये व्याज आणि मुद्दल रक्कम यांचा समावेश असतो. ईएमआयचा म्हणजेच मासिक परतफेडीचा विचार केल्याशिवाय कर्जाची रक्कम आणि परतफेडीची मुदत निश्चित होत नाही. सर्वसाधारणपणे पर्सनल लोन हे असंरक्षित कर्जाच्या प्रकारात येत असल्यामुळे यासाठी व्याजदर थोडा जास्त असतो मात्र कागदपत्रे कमीतकमी लागतात.
व्यक्तिगत कर्जाच्या ईएमआयची निश्चिती/आकारणी कशी होते
व्यक्तिगत कर्ज अनेकदा सर्वप्रकारच्या व्यक्तिगत गरजांसाठी, अन्य कर्जाचे थकलेले हफ्ते भरण्यासाठी किंवा घरातील कसलेही छोटे-मोठे न टाळता येणारे खर्च यासाठी वापरलं जातं. फर्निचर किंवा गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठीही तसंच लग्न वगैरे समारंभासाठी व्यक्तीगत कर्ज काढली जातात.
तुमची कर्ज पत क्षमता (क्रेडिट स्कोअर) तसंच दरमहा उत्पन्न आणि खर्च यावरुन तुमची कर्ज परतफेडीची क्षमता निश्चित करुन बँका व्यक्तिगत कर्जाची रक्कम ठरवतात.
व्यक्तिगत कर्ज ईएमआय कॅल्क्युलेटर कसं मदत करु शकतं
आपण घेत असलेल्या कर्जाचा मासिक हफ्ता किती असेल याची आधीच कल्पना असेल तर आपल्याला आर्थिक नियोजन करणं सोपं जातं. आपल्या दरमहा मिळकतीतून किती रक्कम कर्ज परतफेडीसाठी बाजूला काढून ठेवायची आहे, याची आधीच कल्पना येते. यामुळे तुम्ही कर्ज आणि त्यावरील व्याज तसंच कर्जाची शिल्लक राहिलेली रक्कम याचाही आढावा घेऊ शकता. कर्जाच्या ईएमआयची आगावू माहिती असणं चांगल्या आर्थिक शिस्तीचं लक्षण आहे.
कर्ज ईएमआय कॅल्क्युलेटरचे फायदे
- आपली कर्ज घेण्याची क्षमता समजते
- किती मुदतीसाठी किती कर्ज घेऊ शकतो, याचं नियोजन करता येतं
- कर्जाच्या परतफेडीचं निश्चित नियोजन करता येतं
- गरजेनुसार मुदतपूर्व कर्ज परतफेड कधी करायची ते ठरवू शकतो
व्यक्तिगत कर्जाचे फायदे
व्यक्तिगत कर्जाचे अनेक फायदे आहेत, त्यापैकी काही
- आयत्यावेळी उद्भवणाऱ्या खर्चासाठी व्यक्तिगत कर्ज हा चांगला उपाय ठरू शक
- आयत्यावेळच्या खर्चामध्ये आजारपण किंवा लग्न समारंभ किंवा वाढदिवस याच्या आयोजनाचा खर्च
- महत्वाच्या गृहोपयोगी साहित्याची तसंच फर्निचरची खरेदी
- काही थकलेली देणी देण्यासाठी
टॉप न्यूज़
Thane lockdown in Hotspot | ठाणे शहरातील 16 Hotspot क्षेत्रात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन
Nashik Lockdown Update | पुढील आदेशापर्यंत नाशिक शहरातील शाळा, कॉलेज बंद
Special Report | काँगो देशातला डोंगर म्हणजे सोन्याची खाण; व्हिडीओ व्हायरल
CoronaVirus | ठाण्यात पुन्हा हॉटस्पॉट मध्ये लॉकडाऊन! नागरिकांनी नियम पाळण्याचे आवाहन
उज्जैनच्या शिप्रा नदीत सलग विस्फोट; नदी जवळच्या परिसरात भीतीचं वातावरण
IPL 2021 | विराट कोहलीच्या नेतृत्त्वात RCB विजयी होणार? पाहा सीझनचं संपूर्ण शेड्यूल
JEE Main 2021 Result Released: जेईईचा फेब्रुवारी सेशनचा निकाल जाहीर, असा पहा निकाल
Breaking News LIVE : टेस्टिंगला सहकार्य करा, अन्यथा कठोर पाऊलं उचलावी लागतील; कल्याण डोंबिवली मनपा आयुक्तांचा इशारा
Maharashtra Corona Update | राज्यात आज 8744 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 9068 जण कोरोनामुक्त
Maratha Reservation | आरक्षण राज्यांच्या अधिकारापलीकडचं... Special Report