(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 08 AM : 14 जुलै 2024: ABP Majha
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 08 AM : 14 जुलै 2024: ABP Majha
मुख्यमंत्री शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर, मुख्यमंत्री आषाढी सोहळ्याची पाहणी करणार , यावेळी ते वेळापूर ते भंडी शेगावमध्ये माऊलींच्या पालखीत सहभागी होण्याची शक्यता.
आज संत ज्ञानेश्वरांचं पालखी सोहळ्यातील तिसरं गोल रिंगण, ठाकूर बुवाची समाधी इथं रिंगण पार पडणार .
सोलापुरच्या माळशिरस तालुक्यातील खुडूसमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दुसरं रिंगण, प्रशांत खिलारेंनी टिपलेली रिंगण सोहळ्याची ही खास दृश्य एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी.
आषाढी सोहळ्यासाठी १८ ते २० लाख भाविक येण्याचा अंदाज, सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून महालक्ष्मी मंदिर , व्यंकटेश मंदिर आणि बाजीराव पडसाळीचा भाग आपत्कालाीन व्यवस्थेसाठी मोकळा.
अमरावतीवरून वारकऱ्यांना घेऊन पंढरपूर स्पेशल रेल्वे आज रवाना, यावेळी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा भाजप आणि युवा स्वाभिमान पार्टी तसेच विविध पक्षाकडून सत्कार.
वर्ध्यातून आठ बस गाड्या पंढरपूरसाठी रवाना, पंढरपूरसाठी 45 बस फेऱ्यांचे नियोजन, उशिरा का होईना बस मिळाल्याने वारकऱ्यांकडून आनंद व्यक्त.
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पंढरपुरसाठी १२ विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय, १५ ते २० जुलैदरम्यान पुणे ते मिरज या गाड्यांनी प्रवास करता येईल.