IPL 2021 | कोळी गाण्यावर मुंबई इंडियन्सचे खेळाडू ठेका धरतात तेव्हा...
आयपीएल 2021 ची सुरुवात होण्यासाठी आता अवघे काही तासच शिल्लक असतानाच मुंबई इंडियन्स या संघाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.
![IPL 2021 | कोळी गाण्यावर मुंबई इंडियन्सचे खेळाडू ठेका धरतात तेव्हा... Watch mumbai cricketer Rohit Sharma Leads The Way As Mumbai Indians Stars Groove On Marathi Song IPL 2021 | कोळी गाण्यावर मुंबई इंडियन्सचे खेळाडू ठेका धरतात तेव्हा...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/07/251ece2615612c42242e1f6bdd2da573_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IPL 2021 | आयपीएलचा नवा हंगाम सुरु होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक असतानाच प्रत्येक संघ तयारीला लागला आहे. आयपीएल म्हणजे क्रिकेट आणि मनोरंजनाची मेजवानी. क्रिकेटचे सामने सुरु होण्यासाठी काहीसा कालावधी शिल्लक असतानाच आता खेळाडू मनोरंजनाच्या मार्गानं क्रीडारसिकांच्या भेटीला येत आहेत.
मुंबई इंडियन्स या संघानं नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, जसप्रीत बुमहार हे खेळाडू चक्क कोळी गीतावर ठेका धरताना दिसत आहेत. एक नारल दिला दर्या देवाला... असे बोल असणाऱ्या या गाण्यावर ठेका धरत असतानाचा खेळाडूंचा हा व्हिडीओ सध्या कमालीचा व्हायरल होत आहे.
'ओ जी शादी के बाद सबकी लाईफ है रिस्की...', पाहा युझवेंद्र- धनश्रीच्या लग्नाचा धम्माल व्हिडीओ
मुंबईचे मूळ रहिवासी म्हणून कोळी बांधवांकडे पाहिलं जातं. याच कोळी बांधवांसाठी मुंबईच्या संघानं ही सलामीच दिली आहे, असं म्हणायला हरकत नाही. आता मनोरंजनाच्या खेळपट्टीवर मुंबईच्या संघाची चांगलीच कामगिली पाहायला मिळत आहे. तेव्हा संघ आता क्रिकेटचं मैदान गाजवतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
View this post on Instagram
मुंबईच्या कामगिरीवर दृष्टीक्षेप
मागील वर्षी मुंबईच्या संघाने दिल्ली कॅपिटल्स या संघाचा पराभव करत मुंबई इंडियन्सनं पाचव्यांदा आयपीएलचं जेतेपद पटकावलं होतं. कोणत्याही संघानं आयपीएलचं जेतेपद पटकावण्याची ही पहिलीच वेळ. 2020 या वर्षीही रोहित शर्मानंच संघाचं नेतृत्त्वं केलं होतं. सलगच्या दोन विजयांनंतर आला मुंबईचा संघ आयपीएल विजयाची हॅटट्रीक करणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)