Vaibhav Suryavanshi IPL 2025 Auction : एक बिहारी सबपे भारी, 13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीवर पैशांचा पाऊस, युवा खेळाडूसाठी राजस्थानं मोजले कोट्यवधी रुपये
आयपीएल 2025 च्या लिलावात सहभागी होणारा सर्वात युवा खेळाडू बिहारचा वैभव सूर्यवंशी होता.
Vaibhav Suryavanshi IPL 2025 Auction : आयपीएल 2025 च्या लिलावात सहभागी होणारा सर्वात युवा खेळाडू बिहारचा वैभव सूर्यवंशी होता. वयाच्या 13 व्या वर्षी या खेळाडूने यावेळी लिलावात भाग घेतला आणि त्याची मूळ किंमत 30 लाख रुपये होती. वैभवला विकत घेण्यासाठी राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये चुरशीची लढत पाहिला मिळाली, पण शेवटी राजस्थानने बाजी मारली आणि त्याला 1 कोटी 10 लाख रुपयांना विकत घेतले.
13 वर्षांचा वैभव राजस्थान संघाचा भाग
वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी वैभवला एक कोटींहून अधिक रक्कम मिळाली आणि तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात युवा करोडपती बनला. वैभवबद्दल बोलायचे झाले तर, तो बिहारचा रहिवासी आहे आणि देशांतर्गत स्पर्धांमध्ये बिहार संघाचे प्रतिनिधित्व करतो. या मोसमात वैभवला बिहारकडून पहिला रणजी सामना खेळायला मिळाला आणि आत्तापर्यंत त्याने 5 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 100 धावा केल्या आहेत आणि त्याने आतापर्यंत एकही शतक किंवा अर्धशतक झळकावलेले नाही. वैभवने आतापर्यंत एक टी-20 सामना खेळला असून त्यात त्याने 13 धावा केल्या आहेत.
𝙏𝙖𝙡𝙚𝙣𝙩 𝙢𝙚𝙚𝙩𝙨 𝙤𝙥𝙥𝙤𝙧𝙩𝙪𝙣𝙞𝙩𝙮 𝙞𝙣𝙙𝙚𝙚𝙙 🤗
— IndianPremierLeague (@IPL) November 25, 2024
13-year old Vaibhav Suryavanshi becomes the youngest player ever to be sold at the #TATAIPLAuction 👏 🔝
Congratulations to the young𝙨𝙩𝙖𝙧, now joins Rajasthan Royals 🥳#TATAIPL | @rajasthanroyals | #RR pic.twitter.com/DT4v8AHWJT
वैभव सूर्यवंशी केवळ 13 वर्षांचा असला तरी त्याच्या फलंदाजीत ती ताकद आहे. अलीकडेच वैभव भारताच्या अंडर-19 संघात खेळला, जिथे त्याने ऑस्ट्रेलिया-ए विरुद्ध शानदार शतक झळकावले. वैभव सूर्यवंशीने अवघ्या 62 चेंडूत 104 धावांची खेळी केली. त्याच्या बॅटमधून 14 चौकार आणि 4 षटकार आले. वैभव सूर्यवंशी हा त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. वैभव सूर्यवंशी हा बिहारमधील ताजपूर येथे राहतो. हा खेळाडू वयाच्या सातव्या वर्षापासून क्रिकेट खेळत असून तो आठवड्यातून चार वेळा पाटण्याला 3 तास ट्रेनने जात असे.
आयपीएलमधील पाच सर्वात तरुण खेळाडू
वैभव सूर्यवंशी हा आयपीएलचा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. याआधी रे बर्मन हा आरसीबीचा सर्वात तरुण खेळाडू होता, ज्याला वयाच्या 16 व्या वर्षी आरसीबीने खरेदी केले होते. मुजीब उर रहमान वयाच्या 17 व्या वर्षी आयपीएलमध्ये आला होता. वैभव सूर्यवंशीनेही यावर्षी रणजी स्पर्धेत पदार्पण केले. या खेळाडूने बिहारसाठी 5 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, तरीही त्याची बॅट चालली नाही. या खेळाडूला 10 च्या सरासरीने 100 धावाही करता आल्या नाहीत. वैभवने सय्यद मुश्ताकमध्येही पदार्पण केले. हा खेळाडू राजस्थानविरुद्ध 13 धावा करून बाद झाला होता.