43 धावा अन् विराट कोहली होणार आयपीएलमध्ये सात हजारी मनसबदार!
IPL 2023, Virat Kohli : लखनौ आणि आरसीबी यांच्यामध्ये इकाना स्टेडिअमवर आज रंगतदार सामना होईल.

IPL 2023, Virat Kohli : लखनौ आणि आरसीबी यांच्यामध्ये इकाना स्टेडिअमवर आज रंगतदार सामना होईल. लखनौ सुपरजायंट्स पुन्हा एकदा आरसीबीचा पराभव करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. तर आरसीबी पराभवाचा वचपा काढण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. कोलकात्याकडून मिळालेल्या पराभवानंतर आरसीबी पुन्हा एकदा विजयी लय कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असेल. हा सामना आरसीबीच्या विराट कोहलीसाठी महत्वाचा आहे. या सामन्यात विराट कोहली एका मोठ्या विक्रमाला गवसणी घालण्याची शक्यता आहे. त्यासाठी विराट कोहलीला फक्त ४३ धावांची गरज आहे. विराट कोहलीचा सध्याचा फॉर्म पाहाता विराट कोहली नव्या विक्रमला गवसणी घालू शकतो.
विराट विक्रमापासून किंग फक्त ४३ धावा दूर
आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. लखनौविरोधात विराट कोहलीने ४३ धावा केल्यानंतर खास रेकॉर्ड नावावर करणार आहे. विराट कोहलीने लखनौविरोधात ४३ धावांची खेळी केली तर आयपीएलमध्ये सात हजार धावांचा पल्ला तो पार करेल. आयपीएलमध्ये सात हजार धावा करणारा विराट कोहली पहिला आणि एकमेव खेळाडू होईल. विराट कोहलीच्या नावावर सध्या ६९५७ धावांची नोंद आहे. जर विराट कोहलीने आज ४३ धावांचे योगदान दिले तर सात हजार धावांचा पल्ला पार करणारा पहिला खेळाडू ठरेल. दरम्यान, आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा ठोकण्याचा विक्रम विराट कोहलीच्याच नावावर आहे. विराट कोहलीने आयपीएलमध्ये ४९ अर्धशतके आणि पाच शतके झळकावली आहेत.
यंदा विराट कोहली भन्नाट फॉर्मात -
पुन्हा एकदा किंग कोहलीची बॅट चालू लागली आहे. विराट कोहलीच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत आहे. यंदच्या हंगामात विराट कोहली जरदबस्त फॉर्मात आहे. यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फंलदाजात विराट कोहली आघाडीच्या खेळाडूमध्ये आहे. आतापर्यंत विराट कोहलीने आठ डावात ३३३ धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद ८२ इतकी आहे. आतापर्यंत विराट कोहलीने ४९ अर्धशतके आणि पाच शतके झळकाली आहेत. यंदाच्या हंगामात विराट कोहलीने 33 चौकार आणि 11 षटकारासह पाच अर्धशतके झळकावली आहेत.
LSG vs RCB, IPL 2023 : लखनौ आणि बंगळुरुमध्ये लढत
लखनौ संघाने मागील सामन्यात पंजाब किंग्सवर विजय मिळवला. तर दुसरीकडे बंगळुरु संघाला मागील सामन्यात कोलकाताकडून पराभवाचा सामना करावा लागला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ आजच्या सामन्यात विजय मिळवून विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल. तर लखनौ सुपर जायंट्स संघ विजयी मोहित कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरेल. लखनौ संघाने आतापर्यंत आठ पैकी पाच सामने जिंकले आहेत. तर आरसीबी संघाने आठपैकी चार सामने जिंकले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
