(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs AUS Final: भारत की ऑस्ट्रेलिया, कोण जिंकणार विश्वचषक? शाहिद आफ्रिदीसह पाकच्या माजी खेळाडूचा अंदाज
World cup Fianl : अहमदाबादच्या रणांगणात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये लढत होणार आहे. विश्वचषक कोण जिंकणार... याचे उत्तर काही तासात मिळणार आहे.
IND vs AUS Final Prediction By Pak Players : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये अहमादाबादच्या रणांगणात महामुकाबला होणार आहे. विश्वचषकावर कोण नाव कोरणार? याची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरु आहे. प्रत्येकजण आज विश्वचषकावर कोण नाव कोरणार? याचे भाकित करत आहे. पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनीही आजच्या विश्वचषक कोण जिंकणार याचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीन आफ्रिदी, दिग्गज स्पिनर सकलेन मुश्ताक, मोहम्मद युसूफ यांनी आपला अंदाज वर्तवला. दरम्यान, नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रलिया यांच्यामध्ये विश्वचषकाची फायनल होणार आहे. एक लाखांपेक्षा जास्त क्रीडाप्रेमी येण्याची शक्यता आहे. दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. त्याआधी दीड वाजता नाणेफेक होईल.
पाकिस्तानच्या तीन दिग्गजांनी विश्वचषक कोण जिंकणार याचा अंदाज वर्तवला आहे. समा टिव्हीवर क्रिकेटच्या चर्चेत त्यांनी आपला अंदाज वर्तवलाय. मोहम्मद यूसुफ याने सर्वात आधी विश्वचषक विजयाचा दावेदार म्हणून टीम इंडियाचे नाव घेतले. त्यानंतर सकलेन मुश्ताक आणि शाहिद आफ्रिदी यांनी ऑस्ट्रेलिया संघ विश्वचषकाला गवसणी घालेल, असा अंदाज वर्तवला.
मोहम्मद यूसुफ याने टीम इंडिया विश्वचषक जिंकेल असा अंदाज वर्तवला. तो म्हणाला की, विश्वचषकावर टीम इंडिया नाव कोरेल. भारतीय संघ ज्या पद्धतीने खेळतोय, ते पहिल्यांदाच चॅम्पियनल वाटतोय. भारतीय संघ चॅम्पियनसारखा वाटतोय. जर खराब दिवस असेल तर काहीच करु शकत नाही. पण माझ्या मते टीम इंडियाच विश्वचषक जिंकेल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये लढत
India vs Australia World Cup Final 2023 : वीस वर्षांनी पुन्हा एकदा भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत निर्णायक लढाई होणार आहे. 2003 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषकात रिकी पॉन्टिंगच्या ऑस्ट्रेलियानं सौरव गांगुलीच्या टीम इंडियाचा फायनलमध्ये धुव्वा उडवला होता. त्यानंतर दोन्ही संघ पुन्हा एकदा विश्वचषकाच्या फायनलच्या रणांगणात आमनेसामने येतायत. रोहित शर्माची फौज विश्वचषकावर भारताचं नाव तिसऱ्यांदा कोरणार का...? की, पॅट कमिन्स अँड कंपनी ऑस्ट्रेलियाला सहाव्यांदा विश्वचषक जिंकून देणार... या प्रश्नाचं उत्तर रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मिळणारय..विश्वचषकात भारताने सलग 10 सामन्यात विजय मिळवलाय. गोलंदाजी, फलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंना सर्वस्वी योगदान दिले. सांघिक खेळाच्या बळावर टीम इंडियाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी धावांचा पाऊस पाडला तर गोलंदाजी सिराज, बुमराह आणि शामी यांनी कमाल केली. त्याशिवाय अय्यर, राहुल, कुलदीप आणि जाडेजा यांचेही मोलाचे योगदान आहे.