Ind vs Aus 4th Test : हॅप्पी रिटायरमेंट... विराट-रोहितने पुन्हा मोक्याच्या क्षणी टाकल्या नांग्या, सोशल मीडियावर 'रिटायर व्हा!' ट्रेंड
टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी पुन्हा मोक्याच्या क्षणी नांग्या टाकल्या आहे.
Australia vs India 4th Test : टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी पुन्हा मोक्याच्या क्षणी नांग्या टाकल्या आहे. मेलबर्न कसोटीतही या खेळाडूंची बॅट पुन्हा एकदा शांत दिसली. हे दोन्ही खेळाडू त्यांच्या कसोटी कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर आहेत. अशा परिस्थितीत हा दौरा त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मात्र रोहित आणि विराट या मोठ्या संधीचा फायदा उठवण्यात अपयशी ठरले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान टीम इंडियामध्ये बदल करण्याची मागणी अनेकवेळा करण्यात आली असून यातील एक दिग्गज कसोटी फॉरमॅट सोडू शकतो, असे मानले जात आहे.
मेलबर्न कसोटीत रोहित-विराट पुन्हा फेल
मेलबर्न कसोटीतील विजय टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा आहे, अन्यथा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न भंगले जाऊ शकते. पण या मोठ्या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली पूर्णपणे फ्लॉप ठरले. मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात रोहित शर्माने 3 धावा केल्या होत्या. त्याचवेळी दुसऱ्या डावातही तो केवळ 9 धावाच करू शकला. दुसरीकडे विराट कोहलीही फ्लॉप ठरला. पहिल्या डावात 36 धावा केल्यानंतर त्याला दुसऱ्या डावात केवळ 5 धावा करता आल्या. या खराब कामगिरीनंतर रोहित आणि विराट आता चाहत्यांच्या निशाण्यावर आले आहेत.
Rohit & Virat retire from Tests. Thank you for the memories 🏏🇮🇳 Happy Retirement #INDvsAUS pic.twitter.com/hMzuy9U9cm
— Ꭺʀɢʜʏᴀ (@ARGHYA421) December 30, 2024
भारतीय चाहते रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीबद्दल सोशल मीडियावर अभिनंदन करत आहेत. म्हणजेच या दोन खेळाडूंची कसोटी कारकीर्द आता संपली असून भविष्यात ते कसोटी खेळताना दिसणार नाहीत, असा विश्वास चाहत्यांना आहे. या दोन खेळाडूंच्या निवृत्तीबाबत सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होत असून '#HappyRetirement' हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. विराटचा फोटो शेअर करताना एका यूजरने लिहिले, 'विराट कोहलीच्या निवृत्तीच्या शुभेच्छा.' त्याचवेळी एका यूजरने रोहितसाठी लिहिले की, 'रोहित आणि विराटने कसोटीतून निवृत्ती घेतली! आठवणींसाठी धन्यवाद. निवृत्तीच्या शुभेच्छा.
Happy Retirement Virat Kohli 🙏#INDvsAUS #INDvAUS pic.twitter.com/b8ynBq9oA3
— 𝗠𝗲𝗺𝗲 𝗙𝗲𝘃𝗲𝗿 (@meri_mrziii) December 30, 2024
रोहित शर्मासाठी ही मालिका खूपच खराब राहिली. आतापर्यंत त्याला 3 सामन्यांच्या 5 डावात 6.20 च्या खराब सरासरीने केवळ 31 धावा करता आल्या आहेत. ज्यामध्ये 10 धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्याचबरोबर विराट कोहलीने 4 सामन्यांच्या 7 डावात 27.83 च्या सरासरीने 167 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 1 शतकाचा समावेश आहे. मात्र या शतकाशिवाय संपूर्ण मालिकेत त्याने काही विशेष कामगिरी केली नाही.
Thank you for your services Ro-Ko
— K.R (@orangearmy77) December 30, 2024
Happy retirement 💐💐💐
We will remember your heroics #INDvAUS #ViratKohli #RohitSharma pic.twitter.com/uYnVzjxOu6
हे ही वाचा -