Ind vs Pak Playing 11 : कुलदीप OUT, चक्रवर्ती IN; पाकिस्तानविरुद्ध सामन्यात रोहित शर्मा घेणार कठोर निर्णय? 'ही' असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
Team India probable playing 11 vs Pakistan : भारत आणि पाकिस्तान 23 फेब्रुवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर एकमेकांशी भिडणार आहे.

India vs Pakistan Playing 11 ICC Champions Trophy 2025 : भारत आणि पाकिस्तान 23 फेब्रुवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर एकमेकांशी भिडणार आहे. गेल्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा 6 गडी राखून पराभव केल्या, त्यामुळे भारतीय संघाचे मनोबल उंचावले आहे. तर पाकिस्तान संघाचे मनोबल खचले आहे. कारण न्यूझीलंडने पाकिस्तानला हरवून विजयाचे खाते उघडले. त्यामुळे हा सामना पाकिस्तानसाठी करो किंवा मरो असा असणार आहे. त्यांना हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचा आहे. पण, भारतीय संघालाही विजयी मालिका सुरू ठेवायची आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध सामन्यात कर्णधार रोहित शर्मा काही मोठे निर्णय घेऊ शकतो. ज्यामुळे पाकिस्तानविरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होऊ शकतो.
One scored his second consecutive ODI TON 💯
— BCCI (@BCCI) February 21, 2025
While the other is back to doing what he does the best ⚡️5️⃣
Presenting the 𝗦 & 𝗦 𝗦𝗛𝗢𝗪 from Dubai ft. Shubman Gill & Mohd. Shami 😎 - By @mihirlee_58
WATCH 🎥🔽 #TeamIndia | #BANvIND | #ChampionsTrophyhttps://t.co/ectFbwZaAD
पाकिस्तानविरुद्धही रोहित शर्मा आणि शुभमन गिल डावाची सुरुवात करतील. दोन्ही फलंदाज जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. गिलने त्याच्या शेवटच्या 4 डावांमध्ये 2 अर्धशतकांसह 2 शतके झळकावली आहेत. तर बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात रोहितही उत्तम लयीत दिसला. अशा परिस्थितीत, दोन्ही खेळाडू पाकिस्तानविरुद्धही सलामीवीर फलंदाजाच्या भूमिकेत असतील.
विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो. पण, गेल्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध तो काही खास करू शकला. श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येईल, तर अक्षर पटेल, केएल राहुल, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा खालच्या मधल्या फळीत फलंदाजी करू शकतात.
टीम इंडियाचे कॉम्बिनेशन बदलणार; रोहित शर्मा घेणार कठोर निर्णय?
फिरकी गोलंदाजी विभागात कुलदीप यादवला वगळले जाऊ शकते, त्याच्या जागी वरुण चक्रवर्तीला संधी मिळण्याची शक्यता आहे. बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात कुलदीपला एकही विकेट घेता आली नाही. चक्रवर्ती व्यतिरिक्त, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा हे फिरकी गोलंदाजीचा भाग असू शकतात. त्याच वेळी, मोहम्मद शमी आणि हर्षित राणा यांना वेगवान गोलंदाज म्हणून संधी मिळण्याची अपेक्षा आहे. गेल्या सामन्यात शमीने 5 विकेट्स घेतल्या होत्या, तर राणानेही 3 विकेट्स घेतल्या होत्या.
पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती.
हे ही वाचा -
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
