(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs PAK: यशस्वी जयस्वालला सलामीला पाठवा, विराटला नको, अन्यथा ते तुम्हाला महागात पडू शकतं, पाकच्या माजी खेळाडूचा इशारा
T20 World Cup 2024: टीम इंडिया आणि पाकिस्तान न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडियमवर आमने सामने येणार आहेत. या मॅचपूर्वी कामरान अकमलनं मोठं वक्तव्य केलं आहे.
T20 World Cup 2024 IND vs PAK न्यूयॉर्क : टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) आमने सामने येणार आहेत. न्यूयॉर्कमध्ये उद्या भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 8 वाजता मॅचला सुरुवात होईल. टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ पाकिस्तानला वरचढ ठरलेला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट चाहत्यांचं या मॅचकडे लक्ष लागलंय. या मॅचपूर्वी भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तानाचा माजी क्रिकेटपटू कामरान अकमलनं मोठं वक्तव्य केलं आहे. भारतीय संघाच्या फलंदाजीच्या क्रमात अडचण असल्याचं कामरान अकमल म्हणाला. विराट कोहलीला सलामीला पाठवू नये, असा सल्लावजा इशारा भारतीय संघाला दिला आहे. कामरान अकमलनं विराट कोहलीला सलामीला पाठवल्यास टीम इंडियाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो, असं म्हटलं.
कामरान अकमलनं भारतीय संघाला फलंदाजीच्या क्रमवारीत बदल करण्याचा सल्ला दिला आहे. इंडिया टुडेच्या बातमीनुसार कामरान अकमल म्हणाला की भारतीय संघाची बॅटिंग ऑर्डर योग्य वाटत नाही. विराट कोहली तिसऱ्या स्थानावर राहून मॅच संपवू शकतो. ही टीम इंडियासाठी महत्त्वाची बाब आहे. यशस्वी जयस्वाल ओपनिंग करु शकतो विराटनं डावाची सुरुवात केल्यास भारतीय संघाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो. भारतीय संघ विराट कोहलीला सलामीला पाठवणार असेल तर त्यांची ती चूक असेल, असं कामरान अकमल म्हणाला.
आयपीएलचा 17 व्या हंगामात आरसीबीकडून खेळताना विराट कोहलीनं सलामीला चांगली कामगिरी केली होती. तेव्हापासून टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाच्या डावाच्या सलामीला विराट कोहलीला पाठवावं अशा चर्चा सुरु होत्या. विराट कोहलीनं आयरलँड विरुद्ध खेळताना केवळ 1 रन केली होती. विराट कोहली सलामीला तर रिषभ पंत तिसऱ्या स्थानी फलंदाजीला आला होता.
भारतीय संघ व्यवस्थापन पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी संघात बदल करु शकते. संजू सॅमसन किंवा यशस्वी जयस्वालला संधी मिळण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा सोबत डावाची सुरुवात करण्याची संधी यशस्वी जयस्वालला दिली जाईल. सूर्यकुमार यादव आणि शिवब दुबे हे देखील संघात असू शकतात. तर, टीम इंडियाच्या गोलंदाजीच्या ताफ्यात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश असेल.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच उद्या होणार असून भारतीय प्रमाण वेळेनुसार रविवारी रात्री 8 वाजता ही मॅच सुरु होईल.
संबंधित बातम्या :