IPL 2022 : श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत केकेआरचा कर्णधार कोण? हा भारतीय खेळाडू कॅप्टन्सीच्या रेसमध्ये अव्वल
Kolkata Knight Riders : आयपीएल 2023 चा आगामी हंगाम सुरु होण्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे 2 ते 3 महिने क्रिकेटला मुकणार असल्याची माहिती समोर येत आहे.
Indian Premier League 2023 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 स्पर्धेला सुरु होण्याकरता काही दिवस शिल्लक असून कोलकाता नाईट रायडर्सचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) दुखापतीनंतर संघाचे नेतृत्व कोण करणार? यावर चर्चा सुरू आहे. संघाकडे बरेच पर्याय असून श्रेयसच्या अनुपस्थितीत शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) संघाचा नवा कर्णधार बनवण्याची चर्चा होत आहे. संघाच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत तो आघाडीवर आहे. सुनील नारायणकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी काहीशी चर्चा होत असली तरी. शार्दुलच्या नावावर एकमत होण्याची अधिक आशा आहे. गेल्या मोसमात शार्दुल दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता. आयपीएल 2023 च्या मिनी लिलावापूर्वी केकेआरने त्याला ट्रेडद्वारे संघात समाविष्ट केले होते.
टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना एका सूत्राने सांगितले की, 'एक-दोन दिवसांत कोलकाता नाईट रायडर्स या हंगामासाठी त्यांच्या नवीन कर्णधाराची घोषणा करेल. यादरम्यान एक कार्यक्रम आयोजित केला जाईल ज्यामध्ये टीम मालक शाहरुख खान व्यतिरिक्त जगातील अनेक प्रसिद्ध व्यक्ती सहभागी होतील. 'फ्रँचायझीला शार्दुल ठाकूरला कर्णधार बनवायचे आहे. कारण यामुळे भारतीय खेळाडूंशी संवाद सुधारेल. आता शार्दुल आणि नारायणमधून जबाबदारी कोणाला मिळणार हे पाहावं लागेल.
श्रेयस संपूर्ण सीझनमधून बाहेर असू शकतो
श्रेयस अय्यर अद्याप संपूर्ण आयपीएल 2023 सीझनमधून अधिकृतपणे बाहेर पडलेला नाही. त्यांच्या पाठीत त्रास झाला असून त्याच्यावर त्याच्या घरी आयुर्वेदिक उपचार सुरू आहेत. श्रेयसला विश्वास आहे की जर त्याच्या पाठीवर ऑपरेशन झाले तर तो जवळपास 5 ते 6 महिने क्रिकेटपासून दूर असेल. अशा परिस्थितीत आयपीएलसह 2023 च्या विश्वचषकात खेळणे त्याच्यासाठी कठीण होणार आहे. सध्या डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. जर श्रेयस असाच फिट झाला तर अर्ध्या मोसमानंतर तो आयपीएल 2023 मध्ये खेळू शकतो. दुसरीकडे, जर त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली, तर तो संपूर्ण हंगामातून बाहेर असेल.
IPL 2023 चे काही नवीन नियम
निर्धारित वेळेबाहेरील प्रत्येक षटकासाठी 30-यार्ड वर्तुळाबाहेर फक्त चार क्षेत्ररक्षकांना परवानगी आहे.
यष्टिरक्षक आणि क्षेत्ररक्षकाच्या चूकीच्या हालचालींमुळे डेड बॉल आणि 5 पेनल्टी रन्स मिळतील.
नाणेफेक झाल्यानंतर संघांनी प्लेईंग इलेव्हनची घोषणा करायची आहे.
फ्रँचायझी 15-खेळाडूंच्या टीम शीटचे नाव देतील, ज्यामध्ये 4 पर्यायांपैकी एक इम्पॅक्ट खेळाडू असेल.
हे देखील वाचा-