IND VS NZ 2nd ODI LIVE: पावसामुळं भारत- न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रद्द
पहिल्या एकदिवसीय सामन्यात सात विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागल्यानंतर शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली भारतीय युवा संघ (India vs New Zealand) दुसरा सामन्यात विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरेल.
LIVE
Background
IND VS NZ 2nd ODI LIVE Updates: पहिल्या एकदिवसीय सामन्यात सात विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागल्यानंतर शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली भारतीय युवा संघ (India vs New Zealand) दुसरा सामन्यात विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरेल. तर, न्यूझीलंडच्या संघाचा हा सामना जिंकून मालिकेवर कब्जा करण्याचा प्रयत्न असेल. न्यूझीलंडच्या चाहत्यांसाठी चांगली बातमी म्हणजे त्यांचा कर्णधार केन विल्यमसन देखील फॉर्ममध्ये आलाय. पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्यानं नाबाद 94 धावांची खेळी करत भारतानं दिलेलं 307 धावांचं लक्ष्य सहज गाठलं.
हेड टू हेड रेकॉर्ड
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांचा विचार करता भारतीय संघ तब्बल 111 वेळा न्यूझीलंडसमोर (India vs New Zealand) मैदानात उतरला आहे. आजवर खेळवल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाचं पारडं काहीसं जड राहिल्याचं दिसून आलं आहे. भारताने 110 पैकी 55 सामन्यात विजय मिळवला आहे. तर, न्यूझीलंड संघाला 50 सामने जिंकता आले आहेत. तर 6 सामने अनिर्णित ठरले आहेत.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा सात विकेट्सनं पराभव
पहिल्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं न्यूझीलंडसमोर 307 धावांचं लक्ष्य ठेवलं. त्यानंतर टॉम लॅथमचं नाबाद शतक आणि केन विल्यमसनच्या 94 धावांच्या खेळीमुळ किवी संघानं हा सामना सात विकेट्सनं जिंकला. या सामन्यात भारताकडून श्रेयस अय्यरनं 80 धावांची खेळी केली. याशिवाय, कर्णधार शिखर धवन आणि शुभमन गिल यांच्या बॅटमधून अर्धशतक झळकली.
सिडॉन पार्कवर भारताची खराब कामगिरी-
भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये हॅमिल्टनच्या सिडॉन पार्कवर सामना होणार आहे. या मैदानावर भारतीय संघानं आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत. यामध्ये भारतीय संघाला आठ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. तीन सामन्यात भारताला विजय मिळवता आला आहे. भारताने या मैदानावर न्यूझीलंडविरोधात सात सामने खेळले आहेत, यापैकी सहा सामन्यात टीम इंडियाचा पराभव झालाय.
संघ-
भारत:
शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, ऋषभ पंत (विकेटकिपर), संजू सॅमसन, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, दीपकुमार उम्मेद, चहलन मलिक, कुलदीप सेन.
न्यूझीलंड:
केन विल्यमसन (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, अॅडम मिल्ने, टिम साउदी.
हे देखील वाचा-
भारत- न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना कुठं पाहायचा? A टू z माहिती