Champions Trophy 2025 : चॅम्पियन ट्रॉफीमध्ये फक्त खेळावर लक्ष, टीम इंडियातील खेळाडूंना बायका-पोरांना प्रवासात देखील सोबत घेता येणार नाही
Champions Trophy 2025 : चॅम्पियन ट्रॉफीमध्ये फक्त खेळावर लक्ष, टीम इंडियातील खेळाडूंना बायका-पोरांना प्रवासात देखील सोबत घेता येणार नाही

Champions Trophy 2025 : ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ला सुरुवात व्हायला अवघ्या 6 दिवसांचा कालावधी उरलाय. दरम्यान, भारतीय संघ देखील लवकरच रवाना होणार आहे. 15 फेब्रुवारी रोजी भारतीय संघ दुबईला रवाना होणार आहे. टीम इंडियातील खेळाडूंना चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान कुटुंबातील कोणालाही सोबत घेता येणार नाही. विशेष म्हणजे खेळाडूंना कुटुंबासोबत प्रवास देखील करता येणार नाही. कारण BCCI चे नवीन प्रवास धोरण या स्पर्धेसह प्रथमच लागू होत आहे.
भारतीय संघ 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेश विरुद्ध दुबईमध्ये पहिला सामना खेळणार आहे. त्यानंतर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध (23 फेब्रुवारी) आणि 2 मार्च रोजी न्यूझीलंड विरुद्ध सामना असणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ दुबईत सर्व सामने खेळेल तर उर्वरित स्पर्धेचे सामने 3 फेब्रुवारीपासून पाकिस्तानमध्ये 19 ठिकाणी होतील. या चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यानच्या कालावधी केवळ तीन आठवड्यांपेक्षा जास्त आहे हे लक्षात घेता, 9 मार्च रोजी होणारा अंतिम सामना विचारात घेतला तरीही, बीसीसीआय खेळाडूंसोबत कुटुंबीयांना परवानगी देणार नाही. नवीन धोरणानुसार, 45 दिवस किंवा त्याहून अधिक कालावधीच्या दौऱ्यात कुटुंब जास्तीत जास्त दोन आठवडे खेळाडूंसोबत राहू शकते.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राच्या माहितीनुसार, "काही बदल झाले तर ते वेगळे आहे, परंतु सध्या तरी या दौऱ्यासाठी खेळाडूंना त्यांच्या पत्नी किंवा जोडीदारासोबत येण्याची शक्यता नाही. वरिष्ठ खेळाडूंपैकी एकाने याबाबत चौकशी केली असता त्याला सांगण्यात आले की धोरणात्मक निर्णयाचे पालन केले जाईल. दौरा एका महिन्यापेक्षा कमी कालावधीचा असल्याने, कुटुंबे खेळाडूंसोबत जाणार नाहीत. परंतु अपवादात्मक परिस्थीतीत प्रत्येक व्यक्तीला संपूर्ण खर्च सहन करावा लागेल कारण बीसीसीआय कोणताही खर्च कव्हर करणार नाही.
BCCI याबाबत अधिकृतरित्या माहिती दिली आहे. परदेश दौऱ्यांदरम्यान 45 दिवसांपेक्षा जास्त काळ भारतातून अनुपस्थित असलेल्या खेळाडू त्यांच्या पत्नी आणि मुले (18 वर्षाखालील) प्रत्येक मालिकेसाठी (स्वरूपानुसार) दोन आठवड्यांच्या कालावधीसाठी एका भेटीसाठी सामील होऊ शकतात. पाहुण्यांच्या कालावधीबाहेरील अतिरिक्त खर्च बीसीसीआयद्वारे कव्हर केला जाणार नाही.
मात्र, पाच कसोटी सामन्यांची मालिका म्हणून जून-जुलै-ऑगस्टमध्ये इंग्लंडच्या पाच कसोटी सामन्यांच्या दौऱ्यात कुटुंब संघासोबत असतील. प्रवासादरम्यान त्यांच्या दोन आठवड्यांच्या मुक्कामाची तरतुद केली जाईल. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर नवीन नियम तयार करण्यात आले होते, ज्या दरम्यान संघ 1-3 ने पराभूत झाला होता, ज्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये शिस्त आणि सुसूत्रता नसल्याबद्दल सर्व स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
